बदली झालेल्या पंचायत समिती च्या कर्मचाऱ्यांना निरोप

बदली झालेल्या पंचायत समिती च्या कर्मचाऱ्यांना निरोप
नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये श्रीगोंदा पंचायत समिती हे श्रीकांत दातीर कार्यालयीन अधिक्षक श्री कैलास जगताप विस्तार अधिकारी पंचायत बापूराव वाकडे व गणेश घाडगे भगत यांची बदली इतर पंचायत समितीमध्ये झालेने पंचायत समिती श्रीगोंदा कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने सर्वांना निरोप देण्यात आला. यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यरत असताना चांगले काम केले असल्याचे यावेळी डॉक्टर रामकृष्ण जगताप गट विकास अधिकारी यांनी सांगितले. बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय जबाबदारीने उत्कृष्ट कामकाज करून सर्व घटकांना सहकारी करण्याचा प्रयत्न या सर्व कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे नागेश लोखंडे यांनी संगीतले.या कार्यक्रमास कर्मचारी युनियनचे अध्यक्ष नागेश
लोखंडे, अमोल गोसावी प्रसाद कुलकर्णी महेश शिंदे दादा मांढरे सुनीता शिंदे सारिका हराळ मनोज बनकर घायाळ भाऊसाहेब पानसरे भाऊसाहेब यांस सह कर्मचारी उपस्थित होते.