महाराष्ट्र

शक्तीने शक्य न झाल्यास युक्तीने लढू पण आरक्षण मिळविणारच – माजी आमदार अभंग

शक्तीने शक्य न झाल्यास युक्तीने लढू पण आरक्षण मिळविणारच – माजी आमदार अभंग

श्रीरामपूर येथे ‘आरक्षण ओबीसींचे’ विषयावर चर्चासत्र व बैठक संपन्न, आरक्षणासाठी सर्वांनी एका छताखाली या – कुदळे

टाकळीभान (प्रतिनिधी) – ओबीसींना सर्वस्तरात आरक्षण मिळालेच पाहीजे. या आरक्षणाच्या लढ्यासाठी ओबीसीमध्ये येत असलेल्या सर्वांनी एकत्र लढा उभारण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे शक्तीने लढणे शक्य न झाल्यास युक्तीने लढू पण आरक्षण मिळविल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी सर्व जातींनी खंब्बीरपणे समता परीषदेचे संस्थापक माजी मुख्यमंत्री छगणराव भुजबळ यांचे पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेवून सर्वांनी एकत्र या असे आवाहन समतापरीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आमदार पांडूरंग अभंग यांनी केले. 

श्रीरामपूर शहरातील माळी बोर्डींग येथे समता परीषदेच्यावतीने ‘आरक्षण ओबीसींचे’ या शिर्षकाखाली आयोजीत तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय कुदळे हे होते तर समता परीषदेचे राष्ट्रीय कार्यकारीण सदस्य व कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सुनिल ससाणे, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपाध्यक्ष सदाशिव रासकर, बंडू आनंदकर, शरद लोंढे, जालींदर कुर्‍हे, दिनुआप्पा गिरमे, दादासाहेब मेहेत्रे, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड हे व्यासपिठावर उपस्थीत होते.

आज ओबीसी मधील प्रत्येक समाजाची स्वतंत्र संघटना असली तरी आपण सर्वजण ओबीसी आहोत हे लक्षात घेवून सर्वजण एकाछताखाली येवून लढलो तर आपल्याला आरक्षणापासून कुणीही रोखु शकणार नाही. ते विखुरलेले समाज सर्वजण एकत्र येण्यास तयार आहेत त्याचे पर्यंत पोहचून सर्वांना एकत्र करण्याची वेळ आली आहे. ते दबलेले आवाज मोकळे करण्याची हिच वेळ आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र या आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन यावेळी पांडूरंग अभंग यांनी केले.

संविधानातील घटनेप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळालेले असताना आज आपल्या सवलती शुन्य झाल्या आहेत हा ओबीसींवर अन्याय आहे. यातून न्याय मिळविण्यासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज आहे. यांचेकडे ओबीसींचा एम्पीरीयल डाटा नाही तर मग त्यात सातशे चुका यांना कशा समजल्या? हा खेळ थांबवा. इतरांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाच विरोध नाही पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. न्यायालयीन प्रक्रीयेच्या नावाखाली ओबीसींचे पाय छाटण्याचे काम सध्या सुरू आहे. आपल्याला डावलण्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लागलीय याचा विचार करा. आडनावावरून जात समजत नसते त्यासाठी घरोघरी जावून सर्व्हे करा आणी आमचे आरक्षण द्या असे आवाहन यावेळी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष व समता परीषदेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य पद्मकांतजी कुदळे यांनी केले.

कुठल्या एकट्या जातीने उभारलेल्या लढ्याला यश मिळू शकत नाही, आपल्याला आपले आरक्षण मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी सांगीतले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे रवींद्र ताजणे, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, सुभाषराव गायकवाड, दादासाहेब मेहेत्रे आदिंनी मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे यांनी केले. सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर आभार प्रकाश कुर्‍हे यांनी मानले. यावेळी तालुका व शहर कार्यकारीणी घोषीत करण्यात आली.

यावेळी नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, पत्रकार साईनाथ बनकर, क्षत्रीय बेलदार समाजाचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर छल्लारे, कुंभार समाजाचे ऋषीकेश झिने, परीट समाजाचे सुनिल जोर्वेकर व राजेंद्र देसाई, दिपक कदम, राजेंद्र सातभाई, रामदास शिंदे, सुरेंद्र गिरमे, प्रभाकर कुर्‍हे, सखाराम टेकाडे, विवेक गिरमे, एकनाथ दुधाळ, सुरेश खैरनार, सुरेश सोनावणे, योगेश बडधे, शरद कळमकर, बबनराव तागड, आदिंसह मोठ्या संख्येने ओबीसी उपस्थीत होते.

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे