राहुरी बस स्थानक इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नांना यश

राहुरी बस स्थानक इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नांना यश
राहुरी शहरातील राज्य मार्गावर असलेली बसस्थानकाची इमारत मोडकळीस आलेली होती, दूरावस्था झालेली इमारत नव्याने होण्यासाठी बसस्थानका साठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली होती त्यांच्या या मागणीला नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हिरवा कंदील मिळाला असून 17 कोटी 25 लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून पाच कोटी रुपयांचा निधी देखील मिळाला आहे लवकरच भव्य अशा बसस्थानकाचे काम सुरू होणार असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले,
30 जानेवारी 2019 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी लेखी निवेदन दिले होते त्यात म्हटले होते की
नगर मनमाड राज्यमार्गावरील प्रमुख असे एक बस स्थानक म्हणून राहुरी बस स्थानकाची ओळख आहे परंतु या बसस्थानकाच्या इमारतीला पन्नास वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे सध्या या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली असून दर्शनी भाग पडलेला आहे या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे राज्य परिवहन महामंडळाने सुमारे 17 कोटी 50 लक्ष रुपये खर्चाचे नवीन इमारतीचे अंदाजपत्रक तसेच आराखडे तयार केलेले आहेत यासाठी शासनाने निधी मंजूर करणे आवश्यक आहे, कृपया राहुरी बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास शासनाकडून निधी मंजूर करण्याची विनंती आहे,
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या रास्त मागणी ला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मंजुरी दिली असून राहुरी शहरात लवकरच भव्य असे बसस्थानक साकार होणार आहे त्यामुळे राहुरीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे
अशी माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारचे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले.