महाराष्ट्र

मा० खा. तुकारामजी गडाख – ज्ञान वाटणारे व ज्ञान घेणारे

मा० खा. तुकारामजी गडाख – ज्ञान वाटणारे व ज्ञान घेणारे

  मा. आमदार व अहमदनगर दक्षिण चे माजी खासदार तुकाराम पा. गडाख यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

    अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर जवळील पानसवाडी या छोटेखानी गावात तुकाराम पा. गडाख यांचा जन्म ०१ सप्टेंबर १९५३ रोजी झाला. त्यांना सर्वजन आदराने भाऊ या नावाने ओळखत असे.

    भाऊचे वकृत्व हे मुलुख मैदानी तोफ असल्यामुळे त्यांच्या बोलणे सर्वसामान्य जनतेला ऐकायला आवडायचे. त्यांनी १९९१ साली श्री. हनुमान विकास व संशोधन मंडळ पानसवाडी हि संस्था स्थापन केली. या संस्थेची १९९२ साली सोनई, नेवासा व शेवगाव या ठिकाणी इ. १ ली. इ. ५ वी. इ. ८ वी चे वर्ग सुरु केले. आज या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. 

इवलेसे रोप लावले दरी || त्याचा वेलू गेला गगनावरी || 

या उक्तीप्रमाणे सध्या केवळ LKG ते चौथी या वर्गाचेच १००० विद्यार्थी आदर्श प्राथमिक विद्यालय सोनई येथे शिक्षण घेत आहे.

    भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदर्श विद्या मंदिर सोनई हि शाळा विविध उपक्रम राबवीत असे. भाऊंचे संघटन कौशल्य व काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येक कार्यक्रम हा अहमदनगर जिल्यातील लोकांचा चर्चेचा विषय होत असे. सन २०१८ व २०१९ साली झालेला शिवजयंती उत्सव हा शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता हजोरोंच्या संख्याने विद्यार्थ, पालक उपस्थित राहिल्याने सर्व सोनई गाव हे भगवामय व शिवमय झाले होते. कोणताही कार्यक्रम साजरा करत असताना त्याचे केलेले सूक्ष्म नियोजन हेच तो कार्यक्रम यशस्वी करत असतो असे ते नेहमी शाळेतील बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत असे.

    ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला शालेय कामासंदर्भात भाऊकडे गेलो असता भाऊनी सांगितले कि, आपल्याला विद्यार्थी, पालक आणि जनसामान्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवायची आहे. त्यासाठी भाऊंनी ७५ मीटर तिरंगा ध्वज असणाऱ्या फेरीचे आयोजन करून त्यामध्ये सर्व महिला पालकांना ५ लाखांच्या साडीचे वाटप केले. सोनईमध्ये सर्वत्र फक्त तिरंगाच दिसावा अशी भाऊंची इच्छा होती. त्यासाठी भाऊंनी एकदम सूक्ष्म नियोजन दिले परंतु दुर्दैवाने पहिली मिटिंग झाली आणि दुसऱ्याच दिवशी कोरोना झाल्यामुळे भाऊंना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. परंतु तेथूनही भाऊ दररोज संध्याकाळी VC द्वारे नियोजनाची माहिती घेत होते. अमृतमहोत्सवाची फेरी भाऊंनी हॉस्पिटलमधून LIVE पहिली. आणि “न भूतो न भविष्यती “ अशी तिरंगा फेरी झाली अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली. परंतु भाऊंना प्रत्यक्ष या प्रभातफेरीत सहभागी होता आले नाही हि खंत शेवटपर्यंत राहिली.

    जसे नारळ बहिरून टणक व कडक पण तेवढेच आतून मऊ व गोड असा भाऊंचा स्वभाव होता. शाळेतील प्रत्येक शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची ते आस्थेने चौकशी करत असे तसेच जर कोणी चूक केली तर अगोदर त्या व्यक्तीला समजून सांगणार व नाही एकले तर रागवणार असा मृदू स्वभाव त्यांचा पाहायला मिळाला.

त्यांची विचारशैली अद्वितीयत्वाला फुलवणारी होती मानवी जीवनाची सांगड हि अध्यात्म, वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घालून दिली.

आकाशाएवढं अफाट हृदय ||

पर्वताएवढे उतुंग मन ||

     अशा स्वर्गीय भाऊंच्या आत्म्यास चिरशांती मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

शब्दांकन : श्री अनिल भाऊसाहेब दरंदले

       मुख्याध्यापक, आदर्श विद्या मंदिर सोनई (प्राथमिक विभाग)

      

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे