तिळापुर येथील जय भवानी मातेच्या यात्रेची जंगी हगामा व बैलगाडा शर्यती ने सांगता.

तिळापुर येथील जय भवानी मातेच्या यात्रेची जंगी हगामा व बैलगाडा शर्यती ने सांगता.
तिळापुर येथील जय भवानी मातेच्या यात्रेची जंगी हगामा व बैलगाडा शर्यती ने सांगता तिळापुर येथे सालाबाद प्रमाणे जय भवानी यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो कोरुना काळात दोन वर्ष यात्रा उत्सव ग्रामस्थांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता परंतु या वर्षी मोठ्या उत्साहाने यात्रा उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी गंगे वरून कावड आणून देवीला गंगाजलाने अभिषेक करण्यात आला सकाळी कावड मिरवणूक करण्यात आली दिवसभर हजारो नागरिकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला संध्याकाळी छबिना मिरवणूक काढण्यात आली होती आगामी यामध्ये चार जिल्ह्यातील मोठ्या मल्लांनी हजेरी लावली गावच्या मानाची कुस्ती पैलवान तिळापुर येथील जालिंदर जाधव यांनी मारली त्यांना एकवीस रुपये रोख व एकवीस हजार रुपये किमतीची चांदीची गदा देण्यात आली ही गदा गावचे हरिभाऊ पवार यांनी बक्षीस म्हणून दिली होती दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतील सर्वात मोठा बैलगाडा भरवण्यात आला या खेळांमध्ये देखील हजारो नागरिक उपस्थित होते दूरवरचे मोठाले बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली या खेळासाठी मोठाले बक्षीसही वितरित करण्यात आले बैलगाडी साठी सायकलचे बक्षिसे ठेवण्यात आले होते त्यामध्ये गावातील कैलासवासी आप्पासाहेब खरात यांच्या स्मरणार्थ एक माजी तंटामुक्ती अध्यक्ष कैलासवासी विठ्ठलराव आघाव यांच्या स्मरणार्थ एक व माजी सरपंच श्री पांडुरंग चोरमले यांनी वितरित करण्यात आलेल्या शेवटच्या बैलगाडा विजेता गावातीलच प्रसिद्ध घोडा बैल मालक विजय गरदरे यांना मानाचं बक्षीस मानचिन्ह देऊन विजेते बक्षीस देण्यात आले अशा रीतीने जत्रेचे स्वरूप होते मोठ्या जल्लोषात यात्रा पार पडली यासाठी तिळापुर ग्रामस्थांनी मोठी कसरत व योगदान दिले बाहेरून आलेल्या महिलांचे व बैलगाडा प्रेमींचे ग्रामस्थांनी आभार मानले त्यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.