गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई,बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगानाऱ्यास केली अटक 

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई,बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगानाऱ्यास केली अटक .

 

अहिल्यानगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. सदर आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत माहिती घेताना दिनांक २९/१०/२०२४ रोजी पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार केले व संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवून पथकास रवाना केले. तपास पथकाने दिनांक २९/१०/२०२४ रोजी सुतगिरणी फाटा, रेल्वे फाटकाजवळ, दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत इसमाचा शोध घेऊन, त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा वय ३२ वर्षे, रा. काझीबाबा रोड, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व १,०००/- रुपये किंमतीचे २ काडतुस असा एकुण ३१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

 

आरोपी इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १०३८/२०२४ आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग बस्वराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे