आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त मुलींनी गायले स्वागत गीत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त मुलींनी गायले स्वागत गीत

 

विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरुषांच्या वेषभूषा

 

मराठवाडा मुक्ति दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे 

 

कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा मुक्तिसंग्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेस महात्मा गांधी व डॉक्टर सर्वपल्ली 

 

आजच्या या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्षा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभुषा परिधान करत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्याध्यापक सुनिल कुर्लेकर सर यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करताना सांगीतले की, ‘१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला ; त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही देखील केली. मात्र जुनागड,जम्मू आणि काश्मीर व हैदराबाद संस्थान ही ३ संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग हा होता. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू , काश्मीर, व लडाख.जम्मू विभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या होती तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध बहुल लोकसंख्या होती.

 

गुजरात मधील जुनागड संस्थान हे हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले संस्थान होते. तसेच ते पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या राजाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. महाबतखान हा या संस्थानचा राजा होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या सहा लाख सत्त्तर हजार सातशे एकोणीस (६,७०,७१९) एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. व बॅरिस्टर जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले. काही राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन सरकारने जुनागडशी जैसे थे (स्‍टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले.                         

 

३ रे संस्थान म्हणजे हैदराबाद.

 

हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी *स्वामी रामानंद तीर्थ* यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला.

 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवीच्या विरूद्ध मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. या लढ्यातील सर्व हुतात्म्यांचे आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल करणे शक्य नाही. 

 

भारताचे तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चिघळलेली परिस्थिती पाहता निझाम शासनाच्या रजाकार सैन्याच्या विरोधात पोलीस कार्यवाही केली. तसेच भारतीय सैन्यापुढे रझाकारांचे सैन्य फार वेळ टिकू शकले नाहीत. शेवटी निजामीशाही सैन्यास माघार घ्यावे लागले आणि सेनाप्रमुख कासीम रझवीला अटक झाली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जनरल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली; आणि निझामाचा पराभव झाला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले

 

अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री.सुनिल कुर्लेकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या संचालनाची धुरा जेष्ठ मुख्याध्यापक श्री सुनिल कुर्लेकर सर मराठे सर सहशिक्षा श्रीमती यादव मॅडम श्रीमती शिनगारे मॅडम श्रीमती मुळे मॅडम श्रीमती काकडे मॅडम यांनी सांभाळली व आभार प्रदर्शन श्री संतोष शिंदे सर यांनी केले

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे