आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
युवा सेनेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त अंगणवाडीच्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप व रक्तदान शिबिर संपन्न…

युवा सेनेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त अंगणवाडीच्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप व रक्तदान शिबिर संपन्न…
युवा सेनेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे युवा शिवसैनिकांच्या वतीने गावातील सर्व अंगणवाड्यांमधील चिमूरड्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबीर घेऊन युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचा वर्धापन दिन या विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी युवासेनेचे विश्वनाथ वाघुले, रणजित कोकणे, संदीप कापसे, सुभाष जगताप,विजय पुंड, भैय्या पवार, दीपक बोरुडे, निलेश भुमकर, दीपक भालेकर ,भैय्या बनकर सिद्धार्थ पारधी, नितीन पवार, गोटू इथापे, उमेश भवार, साहिल रणनवरे,आदी यावेळी उपस्थित होते.