महाराष्ट्र
ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा

ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवाठा योजनेला २४ तास वीज पुरवठा व्हावा या ग्रामस्थांच्या मागणीला कार्यसम्राट आमदार लहुजी कानडे यांनी १७ लाखाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने आं. कानडे यांचा सत्कार करण्यात आला.
४ जुन रोजी या लिंक लाईन फिडरच्या कामाचे प्रत्यक्ष उद्दघाटन करण्यात येणार आसुन यावेळी आ. कानडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्दघाटन पार पडणार आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, अशोकनाना कानडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रा. विजय बोर्डे, मोहन रणनवरे, तंटा मुक्तिचे उपाध्यक्ष अबासाहेब रणनवरे, तंटा मुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, प्राचार्य जयकर मगर, बंडोपंत बोडखे आदी उपस्थित होते.