गुन्हेगारी

तू मला आवडतेस, मला फोन कर असे म्हणत अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या मजनूला कर्जत पोलिसांकडून जेलची हवा

तू मला आवडतेस, मला फोन कर असे म्हणत अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या मजनूला कर्जत पोलिसांकडून जेलची हवा

 

मुलींच्या सुरक्षिततेबाबत पोलीस निरीक्षकांची संवेदनशीलता; आरोपीस तात्काळ अटकेत 

 

कर्जत प्रतिनिधी – महिला-मुलींना सन्मानाने जगता यावे,त्यांना शाळा महाविद्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ओळखीच्या-अनोळखी व्यक्तींकडून त्रास होऊ नये यासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव अधिक संवेदनशील आहेत. त्रास देणाऱ्या अनेक रोडरोमियो,मजणुंना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अद्दल घडवली आहे.प्रसंगी गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा खायल लावली आहे. आता पुन्हा एकदा तालुक्यातील हंडाळवाडी येथील एका मजनुला अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याबद्दल जेरबंद केले आहे. या आरोपीचे नाव आहे 

 बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत(वय-२५) याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर त्याच्यावर भा.द.वी. कलम ३५४ विनयभंगाचा तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कर्जत पोलिसांनी त्याला जेलची हवा दाखवली आहे. त्यास किमान २ महिने जेलची हवा खावी लागणार आहे. याअगोदरही त्याने अनेक मुलींना त्रास दिल्याची, तसेच जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केली . याबाबत सविस्तर माहिती अशी,’प्राजक्ता (बदललेले नाव) ही कर्जत येथील एका शाळेत शिकत आहे.ती शिक्षणासाठी रोज घरापासून शाळेपर्यंत एसटी बसने येते. दि.८ रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येण्यासाठी बसस्थानकावर थांबली होती.त्यावेळी बसस्थानकात असलेला त्याच्या अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला अनोळखी मुलगा दुचाकी वरुन (एम.एच १६ सी.एस २६८८) प्राजक्ताच्या जवळ येऊन त्याने तिच्याजवळ असलेली दप्तराची बॅग ओढून तिच्या हाताला पकडून चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला. आणि ‘तू मला आवडतेस, मला फोन कर’ असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.हा प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या मुलामुलींनी गाडीचे व त्या मुलाचे फोटो काढले होते. सदरचा प्रकार सदर ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थिनींनी कर्जत पोलिसांना कळविला. लगेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, दीपक कोल्हे, ईश्वर माने यांनी तत्काळ स्थानक गाठले आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना विचारपूस केली त्यावेळी असे लक्षात आले की सदर ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी सदर मुलाचे फोटो व त्याच्या गाडीचे फोटो काढले होते. परंतु त्याचा परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर प्राजक्ताने सर्व प्रकार वडिलांना सांगितला.

 

दरम्यान कर्जत पोलिसांनी मुलाचा व गाडीचा शोध घेतला असता त्याचे नाव बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत असल्याचे समजले.घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून . पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने आरोपीला पोलीस अधिकारी अनंत सालगुडे, पोलीस जवान गोवर्धन कदम, श्याम जाधव, सुनील खैरे, यांनी तात्काळ अटकही केली आहे.त्यामुळे रोडरोमियो व त्रास देणाऱ्यांसाठी हा मोठा ‘जोर का झटका’ असल्याचे मानले जाते .

        ही कारवाई पोलीस पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, आनंद सालगुडे, पोलीस जवान गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, श्याम जाधव, ईश्वर माने, दीपक कोल्हे, ईश्वर नरोटे आदींनी केली आहे.

 

असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कळवा कोणाचीही अजिबात गय केली जाणार नाही. 

 त्रासाबाबत मुलींनी निर्भयपणे कर्जत पोलिसांना कळवावे. संबंधित तक्रारदारांचे नाव गुप्त ठेऊन कारवाई केली जाते.मुलींची भीती कमी व्हावी यासाठी शाळा महाविद्यालयात अनेक जनजागृती शिबिरे घेतली आहेत.त्यामध्ये मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरीही असे प्रकार घडताना कुणाच्या निदर्शनास आले तर त्रास देणाऱ्याची माहिती द्या तसेच शक्य असल्यास त्याचे व वाहनांचे फोटो पोलिसांना पाठवा.

      -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे