काष्टी साईनगर शाळेत महात्मा फुलेच्या प्रतिमेचे पुजन करुण विद्यार्थी स्वागत करताना मान्यवर

काष्टी साईनगर शाळेत महात्मा फुलेच्या प्रतिमेचे पुजन करुण विद्यार्थी स्वागत करताना मान्यवर
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळवून त्यांची गुणवत्ता सुधारली तर भविष्यकाळात कोणताही विद्यार्थी हा अज्ञानी रहाणार नाही. यासाठी त्यांना बालपणीच शिक्षणा बरोबर जीवनशास्र शिकविले तर फायद्याचे राहिल असे उद् गार सहकार महर्षी काष्टी संस्थेचे माजी संचालक जयसिंगराव पाचपुते यांनी बोलताना सांगितले.
दि. ११ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ( साईनगर )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, बाल आनंद मेळा तसेच पुढील वर्षी इयत्ता पहिली मध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य डाॕ.संदिप कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल पाचपुते, जिल्हा अध्यक्षा नंदाताई पाचपुते, संजय पालवे, मनोज कदम, दत्तात्रय भुजबळ, डाॕ.साळवे खंडू दळवी, भारत उदमले, यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका मिना चाकणे यांनी करुण अपर्णा शेळके यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमा नंबर साईनगर परिसरातील महिला व पुरुषांनी बाल आनंद मेळ्यामध्ये लहान मुलांच्या कडून वेगवेगळ्या पध्दतीचा बाजार खरेदीकरुण मुलांच्या व्यवहारी ज्ञानाची माहिती घेतली.लहानग्यानी कार्यक्रमात आनंद लुटला.
काष्टी साईनगर शाळेत महात्मा फुलेच्या प्रतिमेचे पुजन करुण विद्यार्थी स्वागत करताना मान्यवर