
मागासवर्गीयंच्या जागेवर संरक्षण भिंतीचे काम करावे असे निवेदन ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांना देताना सविधान ग्रुपचे सदस्य.संरक्षण भिंतीचे काम करावे
टाकळीभान, ता.९: येथील मागासवर्गीय समाज कल्याणच्या नियोजित जागेवर सपाटीकरण व संरक्षण भिंतीचे काम करण्यात यावे अशी मागणी संविधान ग्रुपच्या तर्फे (ता.९) निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळाच्या सर्वानुमते गट नंबर ३२ मध्ये मागासवर्गीय समाजासाठी जागा राखीव केलेली आहे. १४ एप्रिल पर्यंत या जागेवर सपाटीकरण व संरक्षण भिंतीचे काम करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप सदर जागेवर कुठलेही काम न झाल्यामुळे मागासवर्गीय समाजच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. त्यामुळे तातडीने दिलेल्या आश्वासनाची वचन पूर्ती करावी असे सविधान ग्रुपचे अध्यक्ष विनोद रणनवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब रणनवरे, शंकर रणनवरे यांनी केली आहे.
Rate this post