श्री गुरु माऊली सेवा भावी संस्थेच्या वृध्दाश्रमास तहसीलदार पाटील यांच्या सहकार्याने मिळाले रेशनकार्ड

श्री गुरु माऊली सेवा भावी संस्थेच्या वृध्दाश्रमास तहसीलदार पाटील यांच्या सहकार्याने मिळाले रेशनकार्ड
-श्री गुरु माऊली सेवा भावी संस्था या वृध्दाश्रमातील वृध्दांना रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते ही बाब श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कागदपत्रांची पुर्तता करुन वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडे रेशनकार्ड सुपुर्त केले अन आजी आजोबांच्या आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीरामपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघुंडे व त्यांच्या पत्नी सौ कल्पना वाघुंडे या श्रीरामपुर येथील काळाराम मंदिराच्या पाठीमागे गेली पाच वर्षापासून श्री गुरु माऊली सेवाभावी संस्था या नावाने वृध्दाश्रम चालवितात आज या वृध्दाश्रमात २० वयोवृध्द आजी आजोबा तसेच दोन सेवेकरी आहेत वाघुंडे परिवार लोक सहभागातून हा वृध्दाश्रम चालवितात या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता आजी आजोबांचे दवाखान्याचे काम असल्यास रेशनकार्ड नसल्यामुळे मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता ही बाब वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे यांना सांगीतली त्यांनी तातडीने श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कानावर ही बाब घातली त्यांनी पुरवठा विभागातील चारुशिला मगरे वंदना नेटके पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांना कागदपत्रांची पूर्तता करुन रेशनकार्ड देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांना तहसीलदार प्रशांत पाटील याचे हस्ते रेशनकार्ड देण्यात आले तहसीलदार पाटील यांनी दिलेल्या रेशनकार्डमुळे वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी धन्यवाद दिले असुन या रेशनकार्डमुळे वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मोफत सोयी सवलतीचा तसेच आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी सांगीतले