टाकळीभान येथे शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा…

टाकळीभान येथे शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा…
टाकळीभान येथे शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ६ जून शिवराज्याभिषेक दिनी सकाळी छत्रपती शिवरायांच्या ध्वनी गीतांनी परिसर शिवमय झाला होता. ग्रामपंचायत समोर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मोठे छायाचित्र लावण्यात आले होते व त्यास आकर्षक सजावट करण्यात आली होती, शिवराज्यभिषेक छायाचित्रा समोर भव्य शिव पुतळ्याची मूर्ती पूजेसाठी बसवण्यात आली होती व त्या समोर भगवा ध्वज लावण्यात आला होता व जनु प्रत्यक्षात शिवराज्याभिषेक सोहळा थाटल्याचे जाणवत होते. प्रथम सकाळी ९.३० वाजता सरपंच सौ,अर्चना रणवरे यशवंत रणवर ग्राम. सदस्या सौ लता पटारे व भाऊसाहेब पटारे, ग्राम. सदस्या सौ. अर्चनाताई पवार व शिवाजी राव पवार यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. तदनंतर छत्रपती शिवरायांच्या आरतीने व छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, त्या नंतर शासकीय नियमाप्रमाणे, राष्ट्रगीत, देशभक्ती गीत व महाराष्ट्र गीत याने कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी अशोकचे मा. चेअरमन ज्ञानदेव साळुंके, मा. सरपंच मंजाबापू थोरात , शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे,माजी संचालक दत्तात्रय नाईक, सरपंच अर्चनाताई रणनवरे, अशोक चे संचालक आप्पा यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा. जयकर मगर , शंकरराव पवार, सुनील बोडखे, सुनील त्रिभुवन,विलास सपकळ, पांडुरंग मगर, ग्रामसेवक आर एफ जाधव, रावसाहेब वाघुले,अक्षय कोकणे, अण्णासाहेब दाभाडे, सुंदर रणनवरे ,बापू शिंदे, अनिल दाभाडे, मधुकर गायकवाड, किशोर शिंदे, आदींसह शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.