करजगाव विद्यालयाचे शासकिय चित्रकला परिक्षेत यश

करजगाव विद्यालयाचे शासकिय चित्रकला परिक्षेत यश
नेवासा तालुक्यातील करजगाव येथिल श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील शासकिय चित्रकला परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यासह शिक्षक.
करजगाव विद्यालयाचे शासकिय चित्रकला परिक्षेत यश
करजगाव :नेवासा तालुक्यातील करजगाव येथिल श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकिय
एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला परिक्षेत यश मिळविले आहे.
एलिमेंटरी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
A श्रेणी मध्ये आकांक्षा संतोष टेमक व जिज्ञासा विजय मकासरे या दोन विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहे. B श्रेणी मध्ये समृद्धी सूर्यकांत टेमक,तेजल रविंद्र विटनोर ,आराध्या संदीप विटनोर यांनी मिळविली तर 37 विद्यार्थ्यांना C श्रेणी मिळाली.
इंटरमिजीएट चित्रकला परिक्षेचा निकाल 90.90 टक्के लागला असुन समृद्धी अमोल सैंदोरे A श्रेणी मिळविली.B श्रेणी मध्ये वैष्णवी बाळासाहेब बोरूडे,
समर्थ सुभाष चारूडे, पायल शिवाजी गिते, प्रज्ञा संजय माने,सायली काशीनाथ पवार, वैष्णवी लक्ष्मण पुराणे, गीतांजली जनार्धन साळुंके यांनी यश मिळविले तर 22 विद्यार्थ्यीना C श्रेणी मिळाली.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य राम परदेशी ,पर्यवेक्षक एस.ए साळुंके ,कलाशिक्षक सुभाष चारूडे आदी सह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.