सोनईतील कृषी सेवा केंद्र चालका विरुद्ध कृषी विभागाकडुन कारवाई करण्यात टाळाटाळ

सोनईतील कृषी सेवा केंद्र चालका विरुद्ध कृषी विभागाकडुन कारवाई करण्यात टाळाटाळ
सोनई येथील पेठेतील एका नावाजलेल्या कृषी सेवा केंद्र चालकाकडुन खतांचा तुटवडा असताना वंजारवाडी येथील शेतकर्यांकडुन जास्त पैसे घेतल्याचे उघड झाले आहे मात्र शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करुन सुधा दखल न घेतल्याने सदर युवक शेतकरी उच्च न्यायलयच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
याबाबत समजलेली अधिकृत माहिती अशी खताची कृञिम टंचाई निर्माण झाली असताना वंजारवाडी येथील एक युवा शेतकरी याने सोनई येथील पेठेतील नावाजलेले कृषी सेवा केंद्र चालकाकडे सुफला 102626 खताची मागणी केली असता सदर बॅगची किमंत नियमा प्रमाणे 1390 रूपये विक्री असताना दुकान चालका कडुन सदर रासायनिक खताचे 1650 रूपये घेतले गेले.हा प्रकार 29 जानेवारी 2001 रोजी घडला.सदर शेतकर्याने 28 मार्च 2022 रोजी पंचायत समिती कृषी अधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी व कृषीमंञी यांच्याकडे तक्रार केली आहे.तरी याबाबत सदर कृषी केंद्र चालकाला पंचायत तालुका व जिल्हा कृषी अधिकारी यांनी पाठशी घातले.याबाबत शेतकर्याला न्याय मिळत नसल्याने त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे माझ्या अर्जावर काय कारवाई केली याबाबत माहिती अधिकारात विचारण्या केली असता.याबाबत जिल्हा कृषी विभागाची ताराबंळ उडाली.कृषी विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.यामुळे सदर वंजारवाडी येथील युवक शेतकरी आता याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे.या बाबत तालुका पंचायत समिती कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी टाळाटाळ करत असल्याने या आधी सुदधा कुञिम खत टंचाई निर्माण करून हंगामा मध्ये शेतकर्याची मोठया प्रमाणात लुट करतात.कृषी अधिकारी या तालुक्यातील कृषी केंद्र चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात.या आधी सुदधा या भागातील शेतकर्यानी अनेकदा तक्रारी करून सुदधा याबाबत दखल न घेतल्याने आता शेतकरी उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे.गोडावुन मध्ये रासायनिक खताचा साठा उपलब्ध असताना दुकानदार साठा उपलब्ध नसल्याचे सांगत खत टंचाई असल्याचे सांगतात व शेतकर्या कडुन जास्त रक्कम घेवुन खते विकता याला कृषी विभाग पाठीशी घालत असल्याने याबाबत शेतकर्यानी आता दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न पडला आहे.
*चौकट-सदर घटना सोनई पेठेतील एका कृषी सेवा केंद्र चालकाने खताची टंचाई दाखवुन जादा पैसै घेतले.याबाबत माझी लुट झाली असता मी याबाबत कृषी केंद्र चालकाला सांगितले असता मला अरेरावीची भाषा वापरली.या फसवणुकी बाबतची तक्रार मी तालुका पंचायत समिती व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली असता या कृषी सेवा केंद्र चालकाला कृषी अधिकारी पाठीशी घालत आहेत.यामुळे मी आता औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे.
राजेंद्र चंद्रकांत दराडे.तक्रारदार राहणार-वंजारवाडी ता.नेवासा