चनेगाव ते शिंदे वस्ती रस्ता कामासाठी सामाजिक कार्यकर्ते दिघे यांचा उपोषणाचा इशारा

चनेगाव ते शिंदे वस्ती रस्ता कामासाठी सामाजिक कार्यकर्ते दिघे यांचा उपोषणाचा इशारा
राहुरी तालुक्यातील धानोरे येथील चनेगाव ते शिंदे वस्ती रस्त्याचे ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे या रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दिघे यांनी या प्रश्नी उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.
धानोरे येथील शिंदे वस्ती ते झरेकाठी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख मंजूर असताना ठेकेदाराने होऊन ६ महिन्यांपूर्वी या रस्त्यालगतची मोठी झाडी, रस्त्यालगतच्या शेतातील पिंकांसह रस्त्यालगतच्या गोठ्यांचे नुकसान करून गेले, पण या रस्त्याचे काम झालेच नाही. परिणामी हा रस्ता अतिशय खराब झाला आहे.
यामुळे धानोरे परिसरातून ठेकेदाराबद्दल असंतोष पसरला असून, येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दिघे यांनी याप्रश्नी उपोषण करण्याचे ठरवले आहे. आठ दिवसांत ठेकेदाराने काम चालू न केल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती दिघे यांनी दिली आहे.