टाकळीभान च्या महिलांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी… सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे.

टाकळीभान च्या महिलांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी… सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे.
टाकळीभान परिसरातील महिलांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी असून महिलांच्या प्रश्नांसंदर्भात महिलांनी कधीही आपले दार ठोठवावे आपण त्यांचे प्रश्न सोडवण्यास बांधील आहोत, असे प्रतिपादन डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.
यावेळी टाकळीभान येथे माऊली प्रतिष्ठान चारीटेबल ट्रस्ट श्रीरामपूर व सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या, यावेळी त्या म्हणाल्या की महिला प्रामाणिकपणे, मेहनतीने कष्टाने आपल्या प्रपंचाच्या प्रगतीठी धडपड करत असतात. पुरुषांनीही महिलांना आपल्या बरोबरीची चांगली वागणूक देऊन त्यांचा नेहमी आदर सन्मान राखावा. त्याचप्रमाणे येथे पुरस्कारासाठी निवडलेल्या महिला भगिनी ,माता यांनी झाशीच्या राणी प्रमाणे खंबीर व कणखर राहून धैर्याने, कष्टाने व मेहनतीने आपले कुटुंब यशस्वीपणे सांभाळून नेटाने प्रपंच केला तसेच सदैव सकारात्मक विचार सोबत घेऊन कोणत्याही परिस्थितीत हताश न होता वाघिणी सारखे कष्ट करून कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवली व आपल्या सकारात्मक विचार सरणी मुळे आपली मुले उद्योग व्यवसायात यशस्वी झाली,व आपल्या समंजस वागण्याबोलण्यातून जनमानसात आदर्श गृहिणी म्हणून आपण आदराचे स्थान निर्माण केले त्याबद्दल माऊली प्रतिष्ठान चारिटेबल ट्रस्ट श्रीरामपूर व सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या वतीने टाकळीभान व पंचक्रोशीतील कर्तबगार व आपल्या स्वकर्तुत्वाचा ठसा उमटणाऱ्या महिला यांचा आदर्श गृहिणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हिराबाई भास्कर तगरे, सौ अनिता भाऊसाहेब शेळके, श्रीमती कविता बाळासाहेब शिंदे, सौ ताराबाई भाऊसाहेब रोटे, श्रीमती योगिता ज्ञानेश्वर राक्षे, सौ अरुणा नारायण काळे, सलिमा भाभी शेख, सौ छाया ज्ञानेश्वर लोखंडे, श्रीमती शकुंतला गोरक्षनाथ तांदळे, श्रीमती जाकिरा मुस्तफा इनामदार, श्रीमती वेणुबाई एकनाथ लोखंडे, सौ छाया चंद्रकांत लांडगे, श्रीमती सुमनबाई रतन गांगुर्डे, सौ स्मिता सुनिल रणनवरे, सौ कविता बापूसाहेब कोकणे ,श्रीमती मंगल डॅनियल खरात आदी टाकळीभान पंचक्रोशीतील महिलांना त्यांच्या स्वकार्यकर्तृत्वावर आदर्श गृहिणी पुरस्कार देण्यात आले. तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ह-भ-प संगीता ताई शेजुळ, टाकळीभानच्या प्रथम महिला पोलीसपदी निवड झालेली श्री जवरे मामा यांची नात कु. धनश्री अशोकराव मोटे, श्रीमती मीरा गवांदे,वैद्यकीय सेवेचे परदेशातील उच्च शिक्षणाबद्दल कुमारी पल्लवी शेळके यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ह भ प संगीताताई शेजुळ, डॉ. विद्याताई तुपे, साबळे मॅडम ,डॉ सोनल भालेराव, डॉ. मधुबाला लोखंडे, गटकळ पब्लिक स्कूलच्या सुनिता गटकळ मॅडम, माजी ग्रा. सदस्य प्रा. वनिता बोर्डे,पत्रकार अनिताताई तडके, आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ महिला सोनुबाई दिवानजी बोडखे होत्या. राजेंद्र कोकणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महिला या भ्रष्टाचारी नसून त्या सत्तेत असल्यास पारदर्शी व चांगले काम करू शकतात, भविष्यात त्यांना संधी देणे गरजेचे आहे, त्यामुळे निश्चितच भ्रष्टाचारमुक्त कारभार चालून सर्वांना न्याय मिळेल व त्यांच्या हातून चांगले काम होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सौ. मिराबाई जाधव, सौ.संगीता जोशी, सौ.कल्पना कोकणे, सौ.अर्चना मावळे, श्रीमती मंगल जाधव, अरुणा पाबळे,अलका सिद्धेश्वर,रेखा कणसे, तिलोत्तमा शिंदे ,रतनबाई अहिरे, सिताबाई दुशिंग, मंदा गांगुर्डे आशा तगरे ,अनिता लोखंडे, कविता कांबळे, सुरेखा माने ,पटारे ताई आदी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. तर आरोग्यसेवेच्या संगीता शिरसाठ ,सीमा साळवे ,अलका शिरसाठ, शैला भोसले, मीना साबळे, सीमा रणनवरे ,सुनिता रणनवरे ,देवकर मॅडम, मंगल राऊत, शांता परदेशी,मंगल बोडखे, नेत्रा बोडखे, सुनिता बोडखे, सविता बोडखे, कल्याणी बोडखे, आशा बोडखे, सुरेखा बोडखे, मिरिकर ताई, गजानन कोकणे, बंडोपंत बोडखे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे, डॉ. संतोष मोरे दिगंबर मगर, बापूराव शिंदे, विशाल पटारे, आप्पासाहेब रणनवरे, विशाल रणनवरे आदी ग्रामस्थांसह मोठ्या प्रमाणावर महिला माता-भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
: सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य निराधार महिलांचा गौरव करून निश्चित आम्हाला पाठबळ व प्रेरणा दिली आहे आम्ही त्यांच्या पुरस्काराबद्दल आम्ही ऋणी आहोत.
टाकळीभान व परिसरातील सर्व स्तरातील महिलांची स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थितीने खऱ्या अर्थाने महिला मेळावा संपन्न झाला. व पुरस्कार च्या मिळालेल्या शाबासकीने महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.