कोल्हार खुर्द सोसायटीवर महाविकास आघाडी चे वर्चस्व; सत्ताधारी गटाचा धुव्वा

कोल्हार खुर्द सोसायटीवर महाविकास आघाडी चे वर्चस्व
सत्ताधारी गटाचा धुव्वा
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द वि वि कार्य सह सोसायटी च्या निवडणुकीत आमने सामने आलेल्या दोन गटात चुरशीची लढाई होऊन गेल्या महिनाभरापासून उत्कंठा वर्धक निवडणुकीचा निकाल काल महाविकास आघाडी मंडळाच्या बाजूने लागून राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते अनिल पाटील यांच्या बाजूने लागून बहुमत सिद्ध झाले आहे.
कोल्हार सोसायटी ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वळणावर येऊन पोहचली होती, अनेक वेळा कधी बिनविरोध, तर कधी तीन गट, तर कधी चार गट आशा अनेक प्रकारची वळणे घेऊन अखेर विखे गट आणि महविकास आघाडी असे दोन गट आमने सामने निवडणूक रिंगणात उतरले होते, या प्रक्रियेत विखे आणि तनपुरे गट असे 13 उमेदवार आमने सामने उभे होते,
ही निवडणूक 26 तारखेला पार पडली असून यामध्ये महविकास आघाडी मंडळाचे 7 उमेदवार निवडून आले असून सर्व साधारण जागेमध्ये अनिल पाटील, प्रभाकर जाधव, भास्कर घोगरे, दिलीप घोगरे, भटक्या विमुक्त जाती जमती मधून प्रकाश चिखले, विशेष मागास प्रवर्गातून संजय भोसले, आणि महिला प्रतिनिधी सौ लता शिरसाठ यांच्या रूपाने निवडून आलेल्या उमेदवारांनी गावातील विखे गटाच्या बलाढ्य उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे, मात्र महाविकास आघाडी मंडळाचे पराभूत उमेदवार देखील अगदी थोड्या फरकाने पराभूत झाल्यामुळे एक प्रकारे विखे गटाच्या वर्चस्व सुरुंग लावला असल्याचे स्पष्ट आहे, या सर्व राजकीय प्रक्रियेमध्ये अनिल पाटील यांनी नियोजबद्ध आखलेले डावपेच यशस्वी ठरले असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत असून, सर्व यशस्वी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
महाविकास आघडी मंडळाचे बहुमत सिद्ध झाल्यानंतर जल्लोष करताना अनिल पाटील, प्रभाकर जाधव, प्रकाश चिखले भास्कर घोगरे आदी.