जावु तेथे खाऊ ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा -खंडागळे व बंगाळ यांचे अवाहन

जावु तेथे खाऊ ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा –खंडागळे व बंगाळ यांचे अवाहन
बेलापूरः(प्रतिनिधी )-सत्तेतून पैसा व पैशातून राजकारण हि विरोधकांची निती आहे. संस्थांच्या बेकायदेशीर कामातून विरोधकांनी मोठी माया कमविली असून त्याचा वापर राजकारणासाठी सत्तेसाठी केला जात असुन ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा . असे अवाहन संस्थेचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे व भास्कर बंगाळ यांनी केले आहे . प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खंडागळे व बंगाळ यांनी पुढे म्हटले आहे की ,जेथे जावू तेथे खाऊ हे विरोधकांचे धोरण आहे.आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देवून टक्केवारी करायची व आपला स्वार्थ साधायचा हे यांचे उद्योग आहेत.सोसायटीच्या पेट्रोल पंपाचा घोटाळा सभासदांना ठाऊक आहे.याबाबत श्री.शरद नवले यांनी तक्रार केली होती.त्याची चौकशीही झाली.चौकशीत पेट्रोल व डीझेल घटीबाबतचे आरोपात तथ्य असल्याचे आढळले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,श्रीरामपूर यांनी २६/१०/२०१८ रोजी याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावली.त्यात पेट्रोल व डीझेल घटीमुळे एकुण ५लाख १ हजार ३७८इतके आर्थिक नुकसान झाले.तसेच संस्थेच्या स्वस्त धान्य दुकान नं २०/१ व नं ९४/२ मध्ये हमालीसाठी एकुण रु.८४,९८९आणि वाहतुक खर्चापोटी एकुण ५३,८१०खर्च बेकायदेशीर दाखविला.सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८(अ) नुसार कारवाई कां करु नये असे स्पष्ट नमूद केले होते. पुढे हे प्रकरण राजकीय दबाव आणि तडजोडी करुन मिटविले.तथापि या प्रकरणी श्री.शरदराव नवले यांनी सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील केलेले आहे कोरोनामुळे खटला चालला नाही नाहीतर केव्हाच कारवाई झाली असती सदर प्रकरण मिटलेले नाही चूकीच्या कामाची वसुली केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही .सत्ताधा-यांनी आपण साव असल्याचा आव आणू नये. प्रत्येक ठिकाणी नाममाञ सरपंच , चेअरमन निवडायचे.त्यांना नाममात्र ठेवायचे अन काम मात्र आपण उरकायचे नावापुरते व सह्यापुरते त्यांना ठेवायचे आणि कारभार माञ रिमोट कंट्रोलने चालवून वेगवेगळे उद्योग करायचे आणि परस्पर मलिदा लाटायचा हि यांची कार्यपध्दती आहे.याच कमाईच्या जोरावर निवडणुकीत पैसे उधळायचे अन मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करायचा पण तुमच्या काळ्या पिशवीला अन बाकीच्याही प्रलोभनाला मतदार भुलणार नाही हे ग्रामपंचायत निवडणूकीत दाखवून दिले आहे आता सोसायटीतही तेच होणार आहे काही लोक स्वंयः घोषीत नेते होतात जे नेते आहेत तेच निवडणूक लढवितात ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाते ते नेते असतात उमेदवार नसतात हे ही यांना माहीत नाही अशा मतलबी नेत्याचा डाव मतदार उधळून लावतील असा विश्वास गावकरी मंडळाचे श्री.खंडागळे व श्री बंगाळ यांनी व्यक्त केला आहे .