महाराष्ट्र
२० उसतोडणी मजूर कुटुंबाना किराणा किटचे वाटप.

२० उसतोडणी मजूर कुटुंबाना किराणा किटचे वाटप.
भोकर येथील महावितरण कंपनीतील उपकेंद्रात कार्यरत आसलेले वरीष्ठ तंत्रज्ञ कैलास घोळवे यांनी वाढदिवस साजरा करताना होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील घुमनदेव येथील ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूरांच्या अड्यावर जावून २० उसतोड मजूर कुटुंबांना किराणा सामान किटचे वाटप केले व त्यांच्या समवेत आपला वाढदिवस साजरा केला.
हल्ली वाढदिवस म्हटले कि मोठी उधळपट्टी केली जात असून वाढदिवस हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जावू लागल्याने चढाओढ होताना पहावयास मिळत आहे. डी.जे. फटाक्यांची आतिषबाजी, जेवणावळी असे वाढदिवसाचे स्वरुप बदलत असून वाढदिवसावर खर्च करण्याची चढाओढ सुरु झाली आहे.
महावितरणच्या भोकर उपकेंद्रातील वरीष्ठ तंत्रज्ञ कैलास घोळवे यांनी मात्र या सर्व अनाठायी खर्चाला फाटा देवुन पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या घुमनदेव येथील ऊसतोडणी मजूरांच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करुन आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. यावेळी घोळवे यांनी येथील २० मजुरांना किराणा सामानाच्या किटचे वाटप करुन त्या ऊसतोडणी मजुरांना वाढदिवसाच्या आनंदात सामावुन घेतले.याप्रसंगी भोकर उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता वैभव निकम, वरीष्ठ तंञज्ञ वसिम शेख, ज्ञानेश्वर हळनोर, घुमनदेवचे सरपंच पती बाळकृष्ण कांगुणे, गंगा शिंदे, कडु पटारे, संजय घोडे, संभाजी पटारे, सुनिल पवारा, श्रीकांत सिन्नरकर, दादासाहेब पटारे, संजय बनकर, भैरु कांगुणे यासह ऊसतोडणी मजुरांचे कुटुंबिय हजर होते.
टाकळीभान— महिवितरणच्या भोकर उपकेंद्राचे वरीष्ठ तंत्रज्ञ कैलास घोळवे यांनी वाढदिवसाच्या खर्चास फाटा देवून उसतोड मजूर २० कुटुंबांना किराणा सामानाचे किट वाटप केले