बेलापूरात दोन कुटुंबात हाणामारी जिवे मारण्याचा प्रयत्न तिघाविरुध्द गुन्हा दाखल

बेलापूरात दोन कुटुंबात हाणामारी जिवे मारण्याचा प्रयत्न तिघाविरुध्द गुन्हा दाखल
–लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे शेख व सोनवणे या दोन कुटुंबात दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते परंतु ते वाद आपापसात समझोता करुन मिटविण्यात आले तेच वाद कालही उफाळून आले सोनवणे कुटुंब व शेख कुटुंब यांच्यात तुफान हाणामारी झाली मारामारीत लाकडी दांडके लोखंडी साखळीचा वापर करण्यात आला दोन दिवसापुर्वी सोनवणे व शेख कुटुंबातील लहान मुलात वाद झाले होते ते वाद दोन्ही कुटुंबांनी मिटविले त्या वेळी शेख यांच्या मुलाला कचरु सोनवणे याने मारले असा शेख कुटुंबीयांचा आरोप होता त्या रोषातुनच काल दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्या वेळी कचरु धोडीराम सोनवणे विकासा सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले असुन त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत .मारामारीची घटना गावात पसरताच मोठा जमाव जमा झाला बेलापुर पोलीस स्टेशनला मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीसांनी संपुर्ण गावातुन गस्त सुरु केली रात्री बारा वाजेपर्यंत गावात तणावाची परिस्थिती होती पतितपावनचे सुनिल मुथा यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेचे गांभीर्य सांगितले त्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब शेख अकील दादासाहेब शेख बबडी दादासाहेब शेख यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संजय सानंप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत