सोनईतील श्रीरामवाडी येथून टृॅक्टरची घरासमोरून चोरी

सोनईतील श्रीरामवाडी येथून टृॅक्टरची घरासमोरून चोरी
सोनई जवळील श्रीरामवाडी येथीन घरासमोरील टृक्टरची चोरी झाल्याची घटना दि 7रोजी घडली आहे या बाबत अशोक गोपाळराव निमसे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की अमोल अशोक निमसे यांचे सासरे बाळासाहेब धोंडीराम म्हसे रा कोढवड ता राहुरी यांच्या मालकिचा महिंद्रा 575 डि आय एम एच 17 बी एम 3848 हा मी 20/5/2023 रोजी श्रीरामवाडी सोनई येधे माझ्या शेतीच्या कामासाठी आणला होता दि 7रोजी दिवसभर शेतातील कामे उरकुन संध्याकाळी 6वाजेचा दरम्यान घरासमोरील मोकळया जागेत लाॅक करुन लावला होता त्याची चावी माझ्याकडे होती दि 8 रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास टृॅक्टर दिसला नाही आम्ही शोधाशोध केली आसता टृॅक्टर मिळवून आला नाही तेव्हा आमची खात्री झाली कि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असे निमसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण आव्हाड हे करीत आहेत