राहुरी बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर तनपुरेंकडून व त्यांच्या कार्यकंत्याडून मतदारांच्या गाठी भेटी

राहुरी बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर तनपुरेंकडून व त्यांच्या कार्यकंत्याडून मतदारांच्या गाठी भेटी
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. सभापती अरुण तनपुरे यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे यांनी मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहे. राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी, मांजरी, वळण, आरडगाव, तांदूळवाडी आदी. गावांमध्ये हर्ष तनपुरे यांनी सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठ
भेटी घेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राहुरी बाजार समिती स्थापनेपासून तनपुरे घराण्याकडे बाजार समितीची सत्ता राहिली आहे
बाजार समितीचे माजी सभापती अरुण तनपुरे यांनी या संस्थेमध्ये त्यांच्या कार्यकाळात
अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेवुन यशस्वी कार्यकाल पार पाडला आहे. बाजार समिती संस्थेचे यावेळी निवडणुकीमध्ये विखे व कर्डिले यांनी अधिकच लक्ष घातल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असून याच पार्श्वभूमीवर
तनपुरे देखील सावध घेऊन त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. २० एप्रिल रोजी अर्ज माघारीची तारीख आहे व २८ एप्रिल रोजी मतदान होणार असुन पाच ते सहा दिवसच प्रचार करण्यासाठी वेळ असणार आहे. नेते मंडळी कश्या प्रकारे मतदारा पर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा वापरतात हे दिसून येणार आहे.