नाताळ सणानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

नाताळ सणानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
नाताळ सणाचे औचित्य साधुन समता स्पोर्ट क्लबच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी भाग घेतला होता समता स्पोर्ट क्लब बेलापुर यांच्या वतीने दर वर्षी सायकल तसेच धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते समता स्पोर्ट क्लब राबवत असलेल्या उपक्रमाचे हे सलग ३१ वे वर्ष आहे नाताळ निमित्ताने भरविण्यात आलेल्या सायकल स्पर्धेचे उद़्घाटन बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा जेष्ठ पत्रकार मारुती राशिनकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले सायकल स्पर्धेचे पहीले बक्षिस सायकल हे राहुल देशमुख यांनी मिळवीले द्वितीय क्रमांकाचे रुपये २२२२ चे पारितोषिक प्रविण जाधव यांनी मिळवीले तृतीय क्रमांकाचे रुपये 1111चे पारितोषिक चैतन्य कोल्हे यांनी मिळवीले तर उत्तेजनार्थ रुपये 777 चे पारितोषिक मिलींद सोनवणे व रुपये 555 चे पारितोषिक ओम सुळ यांनी मिळवीले धावण्याच्या स्पर्धेचे उद़्घाटन जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई मेजर सुजित शेलार ज्ञानेश गवले मारुती राशिनकर दिलीप दायमा दिपक क्षत्रीय याच्या हस्ते करण्यात आले लहान गटात रुपये 1111 चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुमीत काकडे याने मिळवीले द्वितीय क्रमांकाचे रुपये 777 चे पारितोषिक किरण म्हस्के याने मिळवीले तृतीय क्रमांकाचे रुपये 555चे पारितोषिक किरण काळे याने मिळवीले उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 333 शुभम वाकडे याने मिळवीले तसेच रुपये 222 चे पारितोषिक ओम सुळ यांने मिळवीले मोठा गट धावण्याच्या स्पर्धेचे पहील्या क्रमांकाचे रुपये 3333 चे पारितोषिक किशोर मरकड याने मिळवीले द्वितीय क्रमांकाचे रुपये 2222 चे पारितोषिक दिनेश पाटील याने मिळवीले तृतीय क्रमांकाचे रुपये 1555 चे पारितोषिक प्रविण राऊत याने मिळवीले उत्तेजनार्थ चवथ्या क्रमांकाचे रुपये 1111 चे पारितोषिक ओमकार मते याने मिळवीले उत्तेजनार्थ पाचव्या क्रमांकाचे रुपये 555 चे पारितोषिक विक्रम देशमुख यांनी मिळवीले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री समता स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष रोहन शेलार उपाध्यक्ष विशाल शेलार विजय शेलार संजय शेलार रमेश शेलार बंटी शेलार बाबासाहेब शेलार मेजर किरण शेलार मेजर नितीन शेलार तान्हाजी शेलार दिलीप शेलार पत्रकार सुहास शेलार आदिसह समता स्पोर्ट क्लबचे सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले