आता पंचनाम्याचा फार्स नकोच, थेट अनुदान जमा करा — कोकणे

आता पंचनाम्याचा फार्स नकोच, थेट अनुदान जमा करा — कोकणे
परतीच्या पावसाने सर्वञ धुमाकुळ घातल्याने खरीपाच्या पिकांची दाणादाण झालेली आहे ही वस्तुस्थिती सरकारलाही माहीत आसताना नुकसानीच्या पंचनाम्याचा फार्स करण्यापेक्षा राज्यसरकारने पिचलेल्या बळीराजाचा अंत न पहाता नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी श्रीरामपुर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी केली आहे.
यावेळी कोकणे म्हणाले कि, टाकळीभान परीसरासह राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप पिकांचा घास ओढुन घेतल्याने शेतकरी ऐन दिवाळीत दिवाळ निघाल्याने रडकुंडीला आलेला आहे. पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात जात आहे. परतीच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उध्वस्त झालेला आसल्याने झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी अशी रस्त मागणी होत आहे. नैसर्गिक अपत्तीत शेती पिकांचे नुकसान झाल्यास सरकारने त्यासाठी विमा कवच सुरु केलेले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी सरकारने ठरवुन दिलेला हिस्सा भरत आहेत. माञ विमा कपण्यांकडुन शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. केवळ पैसा कमावणे हा या विमा कंपण्यांचा हेतु आसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. अतिवृष्टीचा कोणताही सर्वे न करता विमा कंपण्यांनी हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्याव जमा करुन शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे.सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या या विमा कंपण्यांवर सरकारचा वचक राहीला नसल्याचे विमा कंपण्यांच्या या कृतीवरुन दिसुन येते. वास्तविक शेतकऱ्यांचे संपुर्ण पिकांचे नुकसान झालेले आसताना हेक्टरी निर्धारीत नुकसान भरपाईची रक्कम देणे गरजेचे आहे. सरकारने यात हस्तक्षेप केला नाही तर पिक विमा भरण्यास शेतकरी धजावणार नाहीत.
यावेळी बोलताना कोकणे पुढे म्हणाले कि, परतीच्या पावसाने झालेल्या दाणादिणीची सरकारमधील मंञी प्रत्यक्ष बांधावर जावुन करीत आहेत. सोयाबिन व कपाशीच्या पिकांचे पुरते नुकसान परतीच्या पावसाने झालेले आहे. पावसानंतरही दिवाळी व ओवाळी निमित्त मजुर मिळत नसल्याने उन्हामुळे सोयाबिनच्या शेंगा फुटुन दाण्यांचा सडा शेतात पडत आहे तर कापुस वेचणीलाही मजुर उपलब्ध होत नसल्याने उरला सुरला कापुसही शेतात पडुन आहे. नुकसानीचे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे मंञी बांधावर सांगत आहेत. चौफेर पिकांची नुकसान झाल्याचे पाहीले जात आसताना सरसगट पंचनाम्याचे आदेश देण्यापेक्षा सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करा. शेतकऱ्यांचे संपुर्ण नुकसान तर झालेलेच आहे मग पंचनाम्यांचा फार्स कशासाठी ? आसा सवालही कोकणे यांनी यावेळी केला आहे.