सोनई घोडेगाव व शनिशिंगणापूर पोलीस ठाणे हद्दीत तब्बल आठ मटक्याच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

सोनई घोडेगाव व शनिशिंगणापूर पोलीस ठाणे हद्दीत तब्बल आठ मटक्याच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
दि.3 मे:-सोनई पोलीस ठाणे तसेच शनिशिंगणापूर घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाने अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/सचिन अडबल यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की रविराज फोटो स्टुडिओ समोर छत्रपती चौक,मोटार रिवायडींग दुकाना शेजारी गाळ्याच्या आडोशाला,घोडेगाव चौफुला,घोडेगाव एसटी स्टँडच्या मागे,रिक्षा स्टॅन्ड जवळ सोनई रोड,येथे हारजीतीचा मटका जुगार चालू आहे अशी माहिती मिळाल्याने स्थागुशा च्या पथकाने तेथे जाऊन कारवाई करून मुद्देमाल जप्त करून सोनई पोलीस स्टेशन येथे ११ आरोपींवर मजुका.कलम १२(अ) प्रमाणे पोकॉ/ज्ञानेश्वर शिंदे ने.स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीत शनिशिंगणापूर घोडेगाव रोडवर हॉटेल शनि महात्मा पार्किंग समोर,शिंगणापूर ते सोनई रोडवर कुराट पार्किंग मध्ये मटका जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर ने.स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली लागलीच स्थागुशा च्या पथकाने तेथे जाऊन केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/सचिन आडबल,पोकॉ/शिवाजी ढाकणे,पोकॉ/ज्ञानेश्वर शिंदे,पोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर,पोकॉ/रोहित मिसाळ यांनी केली आहे.