नागरीकांना सामूदायीक राष्ट्रगीताकरीता आहे त्या जागेवरच थांबण्याचे बेलापुर ग्रामपंचायतीचे अवाहन

नागरीकांना सामूदायीक राष्ट्रगीताकरीता आहे त्या जागेवरच थांबण्याचे बेलापुर ग्रामपंचायतीचे अवाहन
बेलापूर(वार्ताहर)बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य तिरंगा रॅली काढण्यात काढण्यात आली. त्यास हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असुन बेलापूर व परिसरात एकाच वेळेस ध्वजारोहण व सामूदायीक राष्ट्रगीत घेण्यात येणार आहे
देशभरात स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.यात प्रामुख्याने हर घर तिरंगा अभियानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या आभियान अंतर्गत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची सवाद्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जे.टी.एस.हायस्कूलच्या प्रांगणात या फेरीचा शुभारंभ झाला.त्यानंतर गावातून तिरंगा फेरी काढण्यात आली.यात जे.टी.एस.कनिष्ठ महाविद्यालय,जे.टी,एस.हायस्कूल,जि. प. मराठी मुले तसेच मुलींची शाळा,उर्दू शाळा,अहिल्यादेवी होळकर उर्दू शाळा आदिं शाळांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज हाती घेत सहभागी झाले होते.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,हर घर तिरंगा आदि घोषणांनी वातावरण चैतन्यमय बनले होते. सदर प्रसंगी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे कै ,मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम भाजपाचे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे प्रकाश कुऱ्हे महेश कुऱ्हे प्रभात कुऱ्हे आदिसह गावातील विविध मान्यवर,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आदिंसह शाळांचे मुख्यध्यापक तसेच अध्यापक उपस्थित होते. शनिवार दि.१३ रोजी सकाळी साडे आठ वाजता गावातील ग्रामस्थांनी आपआपल्या घरी तिरंगा ध्वजारोहण करावे ,तसेच सकाळी नऊ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत होईल.यावेळी प्रत्येक नागरिकाने आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा असे अवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.