कृषीवार्ता

कोमलवाडीसह परिसरात विजेचा लपंडाव‌; तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित‌ : ग्रामस्थ वैतागले

कोमलवाडीसह परिसरात विजेचा लपंडाव‌; तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित‌ : ग्रामस्थ वैतागले

 

गेवराई तालुक्यातील भाट अंतरवाली सबस्टेशन अंतर्गातील देवपिंपरी, कोमलवाडीसह परिसरातील अनेक गावांची विद्युत पुरवठा हा मागील‌‌ तीन दिवसांपासून मिनिटाला बंद‎ होत असून सतत लाईन बंद राहते‎. हवा पाणी आले तर रात्रभर लाईन‎ बंद राहते. गेल्या तीन दिवसांपासून वीज सतत खंडीत असल्याने गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे अंधार आहे. पावसाळ्याचे दिवस असुन‎ नागरिकांना अंधारात फिरावे लागत‎ आहे. यामुळे जीविताला धोका‎ निर्माण झाला आहे. 

 

परिसरातील सर्व‎ पीठ गिरण्या बंद असल्याने‎ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लाईन पूर्णतः बंद‎ असल्याने सार्वजनिक पाणी पुरवठा‎ पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे‎ नागरीक पिण्याचे पाण्यापासून‎ देखिल वंचित झाले आहे.  

 

तसेच गावातील लहान मुले व‎ आजारी व्यक्तींना जीवन जगणे‎ कठीण होऊन बसले आहे. याबाबत सबस्टेशनला व संबंधित लाईनमन यांना संपर्क साधून लाईन बंद असल्याचे सांगितले असता लाईन वरून गेली आहे. गेवराईला फाॅल्ट आहे. असे सांगितले जात आहे. 

 

विजेच्या‎ लंपडावामुळे जीवनावश्यक पाणी व‎ दळण मिळणे कठीण झाले‎ असल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. लाईन‎ आली तर किती वेळ टिकेल याचे‎ काही सांगता येत नाही. 

 

लाईन आली‎ तर केवळ ५ मिनीट चालते व लगेच‎ लाईन बंद पडते, असे सतत लाईनचे‎ जाणे येणे सुरु आहे.

लाईन गेल्या पेक्षा लाइन आल्यास‎ दुःख होते. कारण आलेली लाईन‎ अजून कधी बंद होईल हे सांगता येत‎ नाही.

 

त्यामुळे सर्व‎ वेळ लाईन राहील याकरिता महावितरण विभागाने योग्य ती‎ तातडीची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी नागरिक‌ करत आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
17:59