सोळू येथे भीषण आग गुरांचा चारा दुचाकी चार चाकी वाहने यांचे नुकसान*

*सोळू येथे भीषण आग गुरांचा चारा दुचाकी चार चाकी वाहने यांचे नुकसान*
आळंदी जवळील सोळु येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. हि आग ट्रान्सफॉर्मर चा स्पोट झाल्यामुळे लागल्याचे निष्पन्न झालेले आहे. या आगीची झळ आजूबाजूच्या गावांना पोहचली असून आजूबाजूच्या गावांचे ही नुकसान झाले.सदरची कंपनी सुमारे चार वर्षापासून बंद अवस्थेत होती या स्पोटा मुळे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि ठिणगी उडाल्यामुळे आजूबाजूंच्या उभ्या असलेल्या वाहने तसेच गुरांचा चारा ची गंजी, आणि जनावरे, गुर ढोरे, यांना हानी झाल्याचे समजते.तात्काळ मदत मिळाल्यामुळे आजूबाजूच्या घरांना हानी होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे, यासाठी आळंदी नगर परिषदेची अग्निशामक दल वाहन सर्वप्रथम येथे पोहोचून मदत कार्य सुरू केले,त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील तसेच पुणे महानगरपालिका येथील अग्निशामक दलाच्या वाहनांनी तात्काळ जागेवर धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सुमारे 100 मीटर पर्यंत या आगी ने परिसर व्यापला.आणि दुकाने पत्रा शेड आजूबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचलेचे समजते.सुमारे 5 वाजून 9 मिनिटांनी आग लागली.सुमारें आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे जखमींना तात्काळ ससून रुग्णालयामध्ये पुढील वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे याबाबत आळंदी पोलीस विशेष तपास करत आहे.