संतप्त घाणेरडे प्रकारामुळे निषेध आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा खेड वकील संघाचा निर्णय*
संतप्त घाणेरडे प्रकारामुळे निषेध आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा खेड वकील संघाचा निर्णय*
एका वारकरी खाजगी संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा घटना वारंवार आळंदीमध्ये घडल्या त्याही खाजगी शिक्षण संस्थेतच.मात्र याचा सोक्षमोक्ष काही लागत नाही.केवळ संस्था रजिस्टर आहे या कारणासाठी तर कितीतरी आरोप असलेल्या संस्था आजही चालू आहेत.यामध्ये दुर्दैवी बाब म्हणजे एका महिलेने या कृत्यास सहभाग घेत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.ही आळंदीच्या पुण्यभूमीला लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात सदर संस्था या स्थानिक नाहीत. आळंदी तीर्थक्षेत्र च्या नावाचा उपयोग करत धार्मिक भावनिक आधारित बऱ्याच संस्था आळंदीत स्थापन आहेत मात्र असे काही प्रकार घडले तर आळंदीचे नाव बदनाम होते यासाठी आळंदीकर ग्रामस्थ प्रचंड संतापलेले आहेत.युवक महिला यांच्यामध्ये याबाबतीत तीव्र संतापाची भावना आहे. दरम्यान खेड तालुका वकील संघाच्या वतीने ॲड,रोहित टाकळकर अध्यक्ष व कार्यकारणी यांनी आरोपीचा निषेध करत खेड कोर्टामध्ये दिनांक 6/1/ 2025 रोजी निषेध ठराव मांडत वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच आरोपी महेश नामदेव मिसाळ उर्फ मामा वय 28 वर्षे रा.खोकरमोहा ता.शिरूर कासार जि. बीड असे या नराधमाचे नाव असून त्याला मदत करणाऱ्या महिला साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आसून अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.अशी माहिती मिळत आहे. अत्याचार झालेली दोन्ही लहान मुले आहेत त्यापैकी एका मुलाच्या पोटात दुखत असल्याने आरोपी महिला ऋतुजा हिने मेडिकल मधून औषध आणण्यासाठी त्या मुलाला पैसे दिले मात्र घडलेल्या प्रकाराबाबत काहीही प्रतिक्रिया दिले नाही औषध आणायला जात असताना या मुलाने शेजारील महिलेचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल वरून आपल्या आई-वडिलांशी संपर्क केला त्यावेळी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पीडित मुलाचे आई-वडील रात्री उशिराने गावातून निघून पाटील आळंदी पोलीस स्टेशन येथे हजर झाले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी गांभीर्याने लक्ष घालत पुढील तपास करत आहेत.आळंदी करांच्या भावना मात्र याबाबत तीव्र असून वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे आळंदीच्या नावलौकिकाला डाग का ?असा प्रश्न विचारला जात आहे.आळंदीतील तरुण याबाबत तीव्र संताप व्यक्त करत एकत्र येत आहेत. एक ना दोन अशा अनेक घटना या खासगी असणार्या संस्थेत घडतात. आमच्या संस्था रजिस्टर आहेत या नावाखाली ही काही संस्थाचालक मग्रुरी करत असल्याच्या घटना पूर्वी घडल्या अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असू न ही संस्थाचालक काही धडा घेत नाही.याबाबत हे आळंदीकर ग्रामस्थ तरुण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.आणि येणाऱ्या काळात दखल घेत या संस्थेचा निर्णय करण्यासाठी मोठे आंदोलन छेडणार असल्याची माहिती समजते.