गुन्हेगारी

घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हा घडल्यापासून सहा महिन्याच्या आत 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

 

घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हा घडल्यापासून सहा महिन्याच्या आत 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

 

राहुरी पोलिसांनी केवळ पंधरा दिवसात केली होती गुन्ह्याची उकल.

 

 आरोपी अटकेपासून 55 दिवसात गुन्ह्याचा तपास संपवुन माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल.

 

गुन्हा घडला दिनांक 25/02/2024

 

मध्यप्रदेशातील आरोपी अटक दिनांक 12/03/2024

 

 मा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल दिनांक 18/04/2024

 माननीय न्यायालयाचा निकाल-दिनांक 04/09/2024

 

 

राहुरी शहरामध्ये गोकुळ कॉलनी येथील ऐश्वर्या अभिजीत खाडे यांच्या मालकीच्या श्री गणेश मोबाईल शॉपी मध्ये दिनांक 25/02/2024 रोजीचे पहाटे तीन वाजता छताचे पत्रे उचकटून आत मध्ये प्रवेश करून त्यामधील 1,73,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, दुकानातील नवीन तसेच रिपेरिंग साठी आलेले जुने चार मोबाईल हँडसेट, सॅमसंग कंपनीचा टॅब, मॅक्झिमो कंपनीचे दोन स्मार्ट वॉच, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआर मशीन व इंटरनेटचे राऊटर असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) दिलीप रुमाल सिंग जाधव व 24 वर्ष राहणार नवालपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश (2) अनिल छत्तरसिंग डावर वय 26 वर्षे राहणार छोटा जुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब राहुरी यांनी दिनांक 04/09/2024 रोजी भारतीय दंड संहिता कलम 457 व 380 या कलमाखाली अपराध केले बाबत दोषी धरून त्यांना *457 या कलमाखाली 3 वर्ष सश्रम* *कारावास व पाच हजार रुपये दंड आणि 380 या कलमाखाली 3 वर्षे सश्रम कारावास व पाच* *हजार रुपये दंड* अशी शिक्षा ठोठावली असून सदर दोन्हीही शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत व त्यांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना पंधरा दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

 

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 24/02/2024 रोजीचे रात्री 08/15 ते दिनांक 25/02/ 2024 रोजी चे सकाळी 10/00 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी ऐश्वर्या अभिजीत खाडे राहणार गोकुळ कॉलनी राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या मालकीचे गोकुळ कॉलनी येथील श्री गणेश मोबाईल शॉपी या मोबाईल दुकानाचे छताचे पत्रे उचकटून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून त्यांचे दुकानातील वर नमूद केल्याप्रमाणे मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता त्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 202/2024 भादवि कलम 457 380 प्रमाणे दिनांक 25/02/2024 रोजी दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा राहुरी पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैराळ, पोलीस हवालदार शेळके, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक, राहुरी टाऊन बीट चे पोलीस अंमलदार यांनी तपास करून घटना ठिकाणी मिळालेल्या आरोपीच्या फिंगरप्रिंट वरून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) दिलीप रुमाल सिंग जाधव व 24 वर्ष राहणार नवालपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश (2) अनिल छत्तरसिंग डावर वय 26 वर्षे राहणार छोटा जुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना राहुरी पोलिसांनी दिनांक 12/03/2024 रोजी नमूद होण्यात अटक केली होती. सदर आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला एकूण 82800/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सॅमसंग कंपनीचा टॅब, पाच मोबाईल हँडसेट, एक स्मार्ट वॉच, सीसीटीव्ही कॅमेरा चा डीव्हीआर, इंटरनेट राउटर तसेच घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले लोखंडी पान्हा, दोन कटवण्या, स्क्रू ड्रायव्हर, टॉर्च ,हेक्साब्लेड पक्कड, चाकू असे साहित्य जप्त केले होते. सदर गुन्ह्याचा पोलीस हवालदार वैराळ यांनी जलद गतीने व बारकाईने सखोल तपास करून आरोपीतांचे विरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून अटक आरोपींचे विरुद्ध *1 महिना 24 दिवसात* माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर आरोपी हे अटक केल्यापासून जेलमध्ये असून त्यांचेवर माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब राहुरी यांचे न्यायालयात अंडर ट्रायल खटला चालवून न्यायनिर्णय दिला. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.त्यामधे फिर्यादी, फिर्यादी चे पती, घटनास्थळ पंचनाम्यावरील पंच ,आरोपीचे निवेदन व जप्ती पंचनाम्या वरील पंच, पोलीस हवालदार ज्ञानदेव गरजे, फिंगरप्रिंट ब्युरो अहमदनगर येथील महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एम.डी.लेंगरे मॅडम व तपासी अंमलदार पोलीस हवालदार वैराळ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट श्री.रवींद्र गागरे व ॲडव्होकेट श्रीमती सविता गांधले यांनी सदर खटल्याचे अतिशय उत्कृष्टरित्या कामकाज पाहिले व त्यांना पोलीस कॉन्स्टेबल महेश शेळके व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी मदत केली आहे.

 

सदर गुन्ह्यांचा तपास माननीय पोलीस अधीक्षक  राकेश ओला  अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलवरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी  बसवराज शिवपुजे  यांच्या मार्गदर्शना त करण्यात आलेली आहे. 

 

राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान करण्यात येते की चोरीच्या गुन्ह्यांचा उकल करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अतिशय चांगला उपयोग होत असल्याने आपण आपल्या आस्थापनेत दुकानात कार्यालयात उच्च प्रतीचे सीसीटीव्ही बसवावे जेणेकरून गुन्हे प्रतिबंध होतो व गुन्हा घडल्यास तो उघडकीस आणण्यासाठी सहाय्य होते.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे