आमदार महेश दादा लांडगे यांच्या महिला सक्षमीकरण इंद्रायणी थडी 2023 उत्स्फूर्त प्रतिसाद*

*आमदार महेश दादा लांडगे यांच्या महिला सक्षमीकरण इंद्रायणी थडी 2023 उत्स्फूर्त प्रतिसाद*
भोसरी येथील गाव जत्रा मैदान या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत भरवण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी धडी- 2023 चे आयोजन आमदार महेश दादा लांडगे यांच्या संकल्पनेने करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमासाठी सुमारे 1000 स्टॉल बांधण्यात आले असून,मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे 1000स्टॉल साठी सुमारे साडेसहा हजार नाव नोंदणी ऑनलाईन आलीअसून सर्वांना संधी मिळावी या हेतूने लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे.ऑनलाइन पद्धतीने सदर स्टॉलची नोंदणी करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीनेच लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली आहे. आकर्षक भव्य असे प्रवेशद्वारासह अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती, तसेच ग्राम संस्कृतीवर आधारित असलेल्या विविध छटा, या इंद्रायणी धडी 2023 मध्ये दिसून येणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात अभिप्रेत असलेला पाटील वाडा उभारण्याचे काम ही प्रगतीपथावर आले असून.इंद्रायणी थडी २०२३ ची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.कोरोना काळानंतर भरणाऱ्या या इंद्रायणी धडी 2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आमदार महेश दादा लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी 2023 ची संकल्पना भोसरी गाव जत्रा मैदान येथे आरंभ करण्यात आली. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आकर्षण असलेल्या या जत्रेला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आणि भोसरी परिसरातील चेहरा मोहराच बदलून गेला होता. आत्ताची येणारी इंद्रायणी थोडी 2023 गाव जत्रा ही कोरोना काळाच्या निर्बंधानंतर येत असल्याने मोठ्या प्रमाणात उत्साह महिला बचत गटांमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्याचबरोबर ज्या महिला बचत गटांना यावेळी स्टॉल साठी संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या वर्षी स्टॉल बाबत प्राधान्याने संधी दिली जाईल आणि तसेच संधी न मिळाल्याबद्दल आमदार महेश दादा लांडगे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कोणीही नाराज न होता. इंद्रायणी थडी 2023 या जत्रेला यशस्वी करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार येऊन या जत्रेची शोभा वाढवावी असे आवाहन ही आमदार महेश दादा लांडगे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.