बेलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वय श्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शुभारंभ.

बेलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वय श्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शुभारंभ.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे जिल्हाधिकारी श्रीरामपूर प्रांत सावंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शेरेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री वय श्री योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा अधिकारी सलीमठ यांनी सांगितले की पालकमंत्री विखे पाटील यांच्या आदेशानुसार शासनासरावरून प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचारी सतर्क करण्यात आले असून वयोश्री योजनेत कुठल्याही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून प्रत्येक जिल्ह्यातून लकी ड्रॉ पद्धतीने 1000 लाभार्थी या योजनेत पात्र करून त्यांना प्रत्येक कि तीस हजार पर्यंतचा खर्च शासन स्तरावरून करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये तळागाळातील कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक लाभार्थ्याने घ्यावयाची असल्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धारम सालीमठ , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,समाज कल्याण अधिकारी देवडे , प्रांतधिकारी किरण सावंत पाटील ,तहसीलदार मिलिंद कुमारवाघ , नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे , जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच स्वाती अमोलीक, उपसरपंच मुश्ताक शेख,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे,गावकरी मंडळाचे नेते जालिंदर कुऱ्हे,भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले,जेष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे,ग्रामपंचायत सदस्य प्रियंका कुऱ्हे,तबसुम बागवान,शफिक बागवान, प्रभात कुऱ्हे,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जीना शेख, गावकरी पतसंस्थेचे संचालक रावसाहेब अमोलिक,विशाल आंबेकर,अजिज शेख,मोहसीन सय्यद,इस्माईल आतार यांचे सह जेष्ठ नागरिक,विविध पदाधिकारी व मान्यवर,पत्रकार,नागरिक उपस्थित होते.