नेवासा तालुक्यातील रांजणगाव व सौंदाळा परिसरात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन

नेवासा तालुक्यातील रांजणगाव व सौंदाळा परिसरात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन
तालुक्यातील रांजणगाव देवी व सौंदाळा परिसरात अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याचे काम खान मालकाकडून रात्रंदिवस सुरू आहे. मात्र तालुका प्रशासनाचे याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष दिसून येते त्यामुळे असं वाटायला लागलं की या खान मालकांना महसूल यंत्रणेचा छुपा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे
रात्रंदिवस काम सुरू असून त्यामुळे तेथील रहिवाशांना झोप न लागणे सारखा ब्लास्टिंग चा आवाज येत असल्याने त्यांचे तिथे राहणे मुश्किल झाले आहे महसूलच्या अधिकाऱ्यांना त्याचे काही देणे घेणे नाही यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असताना महसुली अधिकारी यांना पाठीशी घालण्यामागे या अधिकाऱ्यांची काय प्रयोजन असू शकते हे न समजता इतकी जनता दूध खुळी नक्कीच नाही या खान मालकावर कार्यवाही न झाल्यास तेथील रहिवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. असा इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला आहे रात्रंदिवस येथे हे उद्योग चालत असताना अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का असा सवाल येथील रहिवाशांमधून उपस्थित केला जात आहे येथील खाणीमध्ये 50 ते 100 फूट बोरवेलने बोर घेऊ त्यामध्ये उच्च दर्जाचे काडतुसे वापरून ब्लास्टिंग केले जाते. आणि त्या ब्लास्टिंग मुळे खाणी शेजारील घरांना तडे जात असल्याने तेथील रहिवासी प्रचंड भीतीच्या दडपणाखाली जीवन जगत आहेत .त्याचबरोबर कुंपनलिका आणि विहिरीची पाण्याची पातळी कमी होत आहे याला जबाबदार कोण ब्लास्टिंगच्या हादऱ्याने बोरवेल मधील मोटर खाली जाणे असे प्रकार वारंवार घडत आहे. रात्रंदिवस हे काम चालू असल्याने ब्लास्टिंगच्या आवाजाने झोपेचा त्रास होणे तसेच कायम असले प्रकार सुरू असल्याने येथील रहिवासी रामकिसन आरगडे यांनी रोजच्या त्रासाला कंटाळून प्रशासनाकडे तक्रार केली आहे तसेच या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लहान मुलांना त्या ठिकाणी राहणे असाह्य झाले आहे.
या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असुन खान मालक यांच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य याबाबत चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासनाने यावर तातडीने अंकुश घालावा अन्यथा या परिसरातील नागरिक नेवासा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचे समजते.