ग्रामपंचायत वांगी बुद्रुक येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र कॅम्प संपन्न.

ग्रामपंचायत वांगी बुद्रुक येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र कॅम्प संपन्न.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कॅम्प नुकतेच संपन्न झाले आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या स्वताच्या उदरनिर्वाहा साठी मोल मंजुरी करतांना दिसत आहे तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी कायम भटकंती करतांना दिसत आहे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कायम प्रयत्नात असते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वातंत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत या प्रकल्पा अंतर्गत आदिवासी समाजाला शंभर टक्के अनुदानावर संसार उपयुक्त साहित्या पासुन शेळ्या गायी म्हशी खावटी अनुदाना पर्यंत विविध प्रकारची प्रकरणे वाटप करत असतात परंतु आदिवासी समाज्यामध्ये शिक्षणाचा ओघ कमी असल्याने यांच्या मध्ये प्रकल्पाविषयी जागरुकता फार कमी आहे किंबहुना लोक प्रकल्पाचा लाभ घेतांना दिसतात प्रकल्पाकडुन प्रकरणं घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते परंतु आदिवासी समाजामध्ये जनजागृती नसल्याने आजही हाजारो आदिवासी यांना जात प्रमाणपत्र मिळालेली नसल्याने त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ घेता येत नाही.
त्या अनुषंगाने आदिवासी एकता परिषद चे कैलास दादा माळी बबन आहेर यांनी वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावी म्हणून प्रयत्न केले त्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी किरण. अ. सावंत श्रीरामपूर तालुका तहसिलदार मिलींद कुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी भाग्यश्री शिंदे तलाठी अशोक चितळकर ग्रामसेविका शितल बाचकर शेतु चालक रामेश्वर पवार खिर्डी आदिवासी एकता परिषद चे कार्यकर्ते यांच्या हस्ते वांगी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय येथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र शिबीर आयोजित करण्यात आले परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान आजही अनेक आदिवासी यांच्याकडे जात प्रमाणपत्रा साठी लागणारे पुरावे अपुर्ण असल्याने त्रुटी निर्माण झाली या त्रुटी शिथल करून राहिलेले आदिवासी यांना जात प्रमाणपत्र मिळावीत या साठी तहसिलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून राहिलेले आदिवासी यांना जात प्रमाणपत्र मिळिवीत म्हणून प्रयत्न करणार असल्याचे कैलास दादा माळी बबन आहेर यांनी सांगितले या शिबिरात मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता