सुमारे १८,लाख ६० ०८५/रू, जिल्हा सुधार योजनेअंतर्गत रस्ता मंजुर.जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा ताई पाचपुते यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ.

सुमारे १८,लाख ६० ०८५/रू, जिल्हा सुधार योजनेअंतर्गत रस्ता मंजुर.जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा ताई पाचपुते यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ.
श्रीगोंदा प्रतिनिधी:- २ऑगस्ट२०२२ रोजी नागपंचमी सणाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा ताई पाचपुते यांच्या हस्ते औटेवाडी ते मेहत्रे मळा रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला
सदरील रस्ता माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते. व नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा न.पा.हद्दीतील प्रभाग क्र.३ मध्ये औटेवाडी ते मेहत्रे मळा खेतमाळीस मळा साठी सुमारे १८,लाख ६० ०८५/रू, जिल्हा सुधार योजनेअंतर्गत रस्ता मंजुर करण्यात आला आहे
या कामासाठी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके,नगरसेविका दीपाली ताई औटी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता यावेळी बोलताना सौ.प्रतिभा पाचपुते यांनी शहर आणि पालिका हद्दीतील विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते नेहमीच पुढाकार घेतात असे सांगितले तर नगराध्यक्षा सौ.शुभांगी ताई पोटे यांनी बोलताना निवडणूक काळात आम्ही नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत असून लॉकडाऊन काळात देखील सर्वाधिक निधी मिळवून विकास कामे सुरू ठेवली भविष्यात देखील कामे करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गटनेते नगरसेवक मनोहर पोटे, नगरसेविका दिपालीताई औटी नगरसेवक बापुशेठ गोरे प्रशांत गोरे अशोक खेडंके हृदय घोडके, शहाजी खेतमाळीस सतिश मखरे निसारभाई बेपारी, , , सतिष मखरे, माजी नगरसेवक मारूती औटी अंबादास औटी सतिश दशरथ तुपे नाना औटी अनिल औटी पांडुरंग औटी तसेच सहकारी मित्र परिवार व स्थानिक नागरिक उपस्थित होते.