गुन्हेगारी

हिंदूंचे धर्मांतर यापुढे असे प्रकार उघड झाल्यास त्याचा बंदोबस्त हिंदूंनीच करावा तो गुन्हेगार पोलीस ठाण्यात स्वतःच्या पायावर चालत आला नाही पाहिजे सागर भैय्या बेग

हिंदूंचे धर्मांतर यापुढे असे प्रकार उघड झाल्यास त्याचा बंदोबस्त हिंदूंनीच करावा तो गुन्हेगार पोलीस ठाण्यात स्वतःच्या पायावर चालत आला नाही पाहिजे सागर भैय्या बेग

 

 

हिंदूंचे धर्मांतर करतांना ते ख्रिश्चन असतात आणि तेच लोकं बलात्कार सारख्या क्लेशदायक, संतापजनक गुन्ह्यात अडकतात तेंव्हा ते दलीत होतात आणि दलितांवर अत्याचार होत आहे म्हणत ओरडतात यापुढे असे प्रकार उघड झाल्यास त्याचा बंदोबस्त हिंदूंनीच करावा तो गुन्हेगार पोलीस ठाण्यात स्वतःच्या पायावर चालत आला नाही पाहिजे त्याशिवाय या घटना कमी होणार नसल्याचे परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी व्यक्त केले आहे.*

                      सोनई जवळील बेल्हेकरवाडी गावातील विनियार्ड चर्च मध्ये दोन अल्पवयीन हिंदू मुलींवर चर्चमध्येच पाशष्ट वर्षीय पाष्टरने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून आरोपींवर कठोर कारवाई करून ते चर्च कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशा मागण्यासाठी सोनई पोलीस ठाण्यावर हजारोंच्या संख्येने गेलेल्या हिंदूंच्या मोर्चाप्रसंगी बोलतांना सागर बेग पुढे म्हणाले की, भारतावर ज्या ख्रिश्चनांनी दोनशे वर्षे हिंदूंवर अनन्वित अत्याचार,धर्मांतर करत राजवट भोगली त्यांची पिलावळ आज धर्मांतराबरोबरच आता बलात्कार, अल्पवयीन मुलींवर अत्याचारही करत आहेत हे प्रकार हिंदू संघटित नसल्याने घडत आहेत.आरोपींना कठोर शासन तर झालेच पाहिजे पण पिडितांच्या मदतीसाठी शासनाने खास सरकारी वकील दिला नाही तर आठ दिवसांनी याच ठिकाणी आम्ही रस्ता रोको करू असा इशारा यावेळी सागर बेग यांनी दिला आहे.

                 ते पुढे म्हणाले की,राहुरी तालुक्यातील उंबरें, ब्राम्हणी,तसेच सोनई याठिकाणी अशा अधर्मी वृत्तीच्या लोकांनी आपला अड्डा तयार केला आहे.याकडे आता विशेष लक्ष द्यायची गरजही सागर बेग यांनी व्यक्त करत श्रीरामपूरात हिंदूंच्या जागृकतेमुळे व आम्ही अशा घटनांचा निकाल जागेवरच लावत असल्याने अशा घटनांची कमी आल्याचे याप्रसंगी आवर्जून सांगितले.

            हजारोंच्या संख्येने आलेल्या मोर्चाला सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सामोरे जात निवेदन स्वीकारले व वरिष्ठांशी विचारविनिमय करून चर्चवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना यावेळी दिले परंतु प्रचंड चिडलेला जमाव चर्चला सील करण्याच्या मागणीवर ठाम असल्याने सागर बेग व स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यावर सोनईकरांकडून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चर्च ला सील ठोकण्याची मागणी मान्य केली.याप्रसंगी सोनई, राहुरी व आसपासच्या गावातील या संतापजनक घटनेने चिडलेले असंख्य हिंदू हजारोंच्या संख्येने मोर्चाला उपस्थित होते.यापुढे अशा घटना घडल्यास त्याचा बंदोबस्त जागेवरच केला जाईल असा निर्णयही मोर्चात यावेळी घेण्यात आला.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे