बौद्धिक विकासाबरोबरच देव,देश आणि धर्मासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे- सागर बेग
राष्ट्रीय श्रीराम संघ शाखा आपापल्या भागात स्थापन करण्याचा युवकांचा कल

बौद्धिक विकासाबरोबरच देव,देश आणि धर्मासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे- सागर बेग
राष्ट्रीय श्रीराम संघ शाखा आपापल्या भागात स्थापन करण्याचा युवकांचा कल
श्रीरामपूर(प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून धर्म कार्य वाढवण्याचा मानस असून युवकांनी आपल्या बौद्धिक विकासाबरोबरच देव,देश आणि धर्मासाठी सुद्धा अवश्य वेळ दिला पाहिजे ती आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून राष्ट्रीय श्रीराम संघाच्या नूतन शाखांचे उद्घाटन गोखलेवाडी, खंडाळा आणि कोपरगाव मधील सुभाषनगर या तीन ठिकाणी सागर बेग यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.देव,देश आणि धर्म कार्याकडे युवकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून धर्माप्रती प्रेमही युवकांमध्ये वाढले आहे.विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय श्रीराम संघ वाढीवर विशेष भर देण्याचे सागर बेग हे बोलले होते त्याप्रमाणे संघ वाढीकडे भर देऊन हिंदुत्व रुजविण्याचे सागर बेग यांचे कार्य आता जोमात सुरू झाले असून राष्ट्रीय श्रीराम संघ शाखा आपापल्या भागात स्थापन करण्याचा युवकांचा कल वाढत आहे.
शहरातील शिवजयंती उत्सवाला उपस्थिती दाखवल्यावर सकाळी अकरा वाजता राहता तालुक्यातील गोखलेवाडी याठिकाणी शेकडो युवकांनी राष्ट्रीय श्रीराम संघात प्रवेश करत शाखा उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली.त्याप्रसंगी बोलतांना सागर बेग म्हणाले की,हिंदू धर्म विरोधी जिहाद्यांच्या कुटील कारवाया वाढत चालल्या असून सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने त्यांचे केलेले लाड आज हिंदू धर्माला व देशाला घातक ठरत चालले आहेत.हिंदू हा विखुरला गेल्याने विधर्मी लोकांनी त्याचा फायदा घेत देशविघातक कारवाया वाढविल्या असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्याप्रमाणे महाराजांनी अठरापगड जातीतील मावळे एक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व विधर्मीयांशी तीव्र लढा दिला त्याचप्रमाणे प्रत्येक हिंदूंनी जातपात विसरून हिंदू म्हणून एक होऊन हिंदू विरोधी जिहाद्यांबरोबर लढा देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.गोखलेवाडी येथील उद्घाटन कार्यक्रमानंतर कोपरगाव शहरातील सुभाषनगर व राहता तालुक्यातील खंडाळा याठिकाणी अशाच उत्साही आणि शेकडो युवक वर्गाच्या उपस्थितीत शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे पदाधिकारी विकी टाक,योगेश पवार,विकास सिंग,निखिल झांझोट यांच्यासह असंख्य हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते.