माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांचा 54 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

*माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांचा 54 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न*
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर साहेब यांचा 19 एप्रिल वाढदिवस या निमित्त अहमदनगर जिल्हात ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आल्याचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी सांगितले
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीरामपूर वतीने येथे शिवपार्वती मंगल कार्यालय येथे जानकर साहेब यांच्या जीवन चरित्र वरील पोवाडा शाहीर शांताराम वगदे यांनी गायण केले.
त्या नंतर श्रीरामपूर येथील साई विठ्ठल अनाथ आश्रमातीत विद्यार्थ्यांना वही, पेन, खेळणी आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच शेवगाव येथे डॉ प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर घेण्यात आले
यावेळी जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे, जिल्हा उपाध्यक्ष विलास सैंदोरे, शिवमल्हार संघटनाचे अध्यक्ष गोरख येळे, श्रीरामपूर, तालुध्यक्ष नंदकुमार खेमनर,गणेश राशीनकर, शहराध्यक्ष सचिन लाटे ,दादा कुशेकर,भारत सोनवणे, पारखे सर, भास्कर कुचेकर आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.