*गेवराई तालुक्यात शिक्षणाची वाट लावणारे महाभाग*

*गेवराई तालुक्यात शिक्षणाची वाट लावणारे महाभाग*
गेवराई तालुक्यात दिर्घ वास्तव्यास एकाच शाळेत असणारे शिक्षक व वारंवार शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे व शिक्षण विभागाचे सर्वेसर्वा स्वतःला समजणारे महाभाग स्वतःची संस्था उघडून गेवराई तालुक्याचे वाटोळेच करायला निघालेत. अधिका-यांच्या आर्शिवादाने काही शिक्षकांनी शाळेवर महिन्याने गडी लावून शिकवायला सुरुवात केली आहे तर काही शिक्षकांनी स्वतःची पतसंस्था / मल्टिस्टेट बँका काढून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचे वाटोळे केलेले आहेत. काही महाभाग शिक्षक स्वतःची संस्था काढून गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हया बंद पाडण्याच्या मार्गांवर निघालेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यायचे सोडून कोल्हेर रोड, गेवराई येथील संस्थेच्या शाळेत उरले सुरले शिक्षक सुध्दा कारभारात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत असून त्यांच्या संस्थेच्या पट वाढताना दिसून येत आहे. पगार घ्यायचा जिल्हा परिषद शाळेमधून आणि काम करायचे स्वतःच्या संस्थेचे व बँकेचे हाच धंदा सध्या गेवराई शहरातील शिक्षकांनी सुरु केल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा बाजार मांडून हे शिक्षक गोरगरीब जनतेच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषद शाळा मोडीत काढून बंद पाडल्याच्या मार्गावर असल्याचे हे महाभाग दिसून येत आहे आणि त्याकडे लोकप्रतिनिधी मा. आमदार साहेब तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे दुर्लक्ष आहे.