नोकरी
ध्येय निश्चित केल्यास यश निश्चित…नूतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोरे यांचे प्रतिपादन…

ध्येय निश्चित केल्यास यश निश्चित…नूतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोरे यांचे प्रतिपादन…
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठरवून त्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन नूतन पोलीस सेवेमध्ये निवड झालेले अव्वलगाव चे भूमिपुत्र पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ताराचंद मोरे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शनाचा अभाव असल्याने त्यांना मार्ग सापडणे थोडे कठीण जाते त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, व यश संपादन होईपर्यंत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवावे असे ते म्हणाले. यावेळी व्हिज्युअल अभ्यासिका केंद्र टाकळीभान यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एडीसी बँकेचे संदीप गांगुर्डे साहेब, डॉ. संतोष मोरे, अभ्यासिका केंद्राचे संचालक महेश शिंदे, प्रशांत जाधव, आदींसह अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.