जि प मराठी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

जि प मराठी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
बेलापूर:(प्रतिनिधी )-गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बेलापूर येथील जि.प. मराठी मुलींची शाळा येथे गुरुपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक -शिक्षिका यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुंचे पुजन करण्यात आले,तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बेलापूर गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विष्णुपंत डावरे उपस्थित होते.विष्णुपंत डावरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आज याच शाळेत शिकतांना चे ते पन्नास वर्षापुर्वीचे दिवस आठवले,ते शिक्षक आठवले ज्यांच्या मुळे आम्ही उत्कृष्ट नागरिक होवू शकलो.तसेच अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम भराटे यांनी छोट्या छोट्या कथा व गोष्टी सांगुन चिमुरड्यांची मने जिंकून घेतली,तसेच त्यातून गुरुपौर्णिमे बद्दलची माहिती समजावून सांगितली. याप्रसंगी मुख्याध्यापिका शहाणे मॅडम, मुख्याध्यापक भालेराव सर, सोनवणे मॅडम, गायकवाड मॅडम,शिक्षण समितीचे अध्यक्ष सुर्यकांत हुडे,डि.के.साठे,बनसोडे मॅडम, परदेशी मॅडम,उदमुले मॅडम,ठुमणे मॅडम, गडकरी मॅडम आदि शिक्षकगण उपस्थित होते.सुत्रसंचालन शहाणे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन गायकवाड मॅडम यांनी केले.