गुन्हेगारी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होऊनही निलंबन नाही; वंचित बहुजन महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होऊनही निलंबन नाही; वंचित बहुजन महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा

 

 

 

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सूर्यवंशी कोरडे यांना आपल्याच विभागात समुदाय आरोग्य अधिकारी महिलेकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल केला आहे. मात्र दोन महिन्यांचा अवधी झाला तरी त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाने अद्याप निलंबनाची कारवाई न केल्याने राहुरी तालुका वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या डॉ. वृषाली तुळशीराम कोरडे (वय-३९) रा. राहुरी यांनी आपल्याच विभागातील महीला अधिकारी यांच्याकडुन ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणीमध्ये १० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दिनांक ८ फेब्रुवारी २०१३ रोजी बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तक्रारदार यांच्याकडून महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी कोरडे यांनी रोख स्वरूपात लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात

आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरीष खेडकर, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,

चालक पोलीस हवालदार हारुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. संदर्भानुसार संबंधित आरोपी डॉ. महिलेस लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहाथ पकडून आज जवळजवळ अडीच ते तीन महिने झाले आहेत तरी जिल्हा परिषद कार्यालय अहमदनगर, आरोग्य विभाग व राहुरी तालुका आरोग्य विभाग अधिकारी यांनी संबंधित आरोपी डॉ. महिलेचे निलंबन केलेले नाही, त्यांचे निलंबन केले असेल तर प्रशासनाने निलंबन केल्याचे पत्र राहुरी तालुक्यातील जनतेला जाहीर करावे अशी मागणी आहे. तसेच बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचा कार्यकाल जितका वर्ष होता त्या सर्व निवेदनातील संदर्भानुसार महिला उपस्थित होत्या.

कार्यकालातील जिल्हा परिषद प्राथमिक अहमदनगर आरोग्य विभाग अंतर्गत जनतेच्या हितकारक शासकीय योजना होत्या त्या शासकीय योजनांची बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य

केंद्रात जनतेच्या कल्याणासाठी हितकारक योजनांचा निधीचा वापर केला आहे का याची सखोल चौकशी करावी व त्याचा अहवाल जनतेला सादर करावा, संबंधित आरोपी महिलेस निलंबन केलेल्या कार्यकाळापासून निलंबन कार्यकाल संपल्यानंतर देखील राहुरी तालुक्यात कोणत्याही जिल्हा परिषद म्हटले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीसाठी हजर करून घेऊ नये. तरी प्रशासनाने निवेदनातील संदर्भानुसार विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित डॉ. महिला आरोपीस निलंबन केल्याचे पत्र तात्काळ प्रशासनाने द्यावे व निलंबन केल्याचे जाहीर करावे.

त्यांना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने पकडून कारवाई केली आहे तरी त्यांचे तात्काळ निलंबन झाल्याचे प्रशासन का जाहीर करत नाही निलंबन करण्यास विलंब का लागत आहे तरी प्रशासकीय प्रमुख या नात्याने भारतीय संविधानिक कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ भारत देशातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे व सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे या हेतूने आपण गांभीर्यपूर्वक या निवेदनाची दखल घ्यावी व संविधानिक कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींना कठोर निर्णय घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी अशी आम्ही आपणास लेखी निवेदनाद्वारे विनंती करत आहोत. अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसात कोणत्याही क्षणी प्रशासकीय कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत असे वंचित बहुजन महीला आघाडीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती राहुरी व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनात

यावेळी उत्तर नगर वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष वर्षाताई बाचकर, युवा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग, जिल्हा महासचिव मनिषाताई साळवे, ज्योतीताई गायकवाड एकलव्य प्रणित आघाडी जिल्हाध्यक्ष, राहुरी तालुका कार्याध्यक्ष अनिताताई जगधने आदी

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे