पत्रकार अशोक काळकुटे यांना धमकी देणाऱ्या कलाकेंद्राला अखेर कुलुप*

*पत्रकार अशोक काळकुटे यांना धमकी देणाऱ्या कलाकेंद्राला अखेर कुलुप*
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्रात एका महिलेला गेल्या काही महिन्यांपूर्वी बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावुन तिच्या १२ वर्षीय मुलीला डांबुन ठेवल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली होती. यानंतर दि.१३ जुन २०२२ रोजी यातील आरोपी भाभी परभणीकर आणि तिच्या सोबत सागर शहाबोद्दीन शेख, शेख समीर शेख अनिस हे पोलीस ठाण्यात आले होते. यादरम्यान सूर्योदय पोर्टलला बातमी लावल्याचा व पोलिस स्टेशन परिसरात फोटो घेतल्याचा राग मनात धरून सूर्योदय संपादक अशोक काळकुटे यांना रात्री १० वाजता बुलेट आणि काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून पोलीस ठाण्याच्या बाहेर निघताच पाठलाग करत नेकनुर येथील बंकटस्वामी कमानीत अडवले आणि शिवीगाळ करत तुझा आता रोडवर अपघात होऊ शकतो अशी धमकी दिली होती. याप्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची काही पत्रकारांसमवेत अशोक काळकुटे यांनी भेट घेऊन तपास वरिष्ठांकडे देण्याची मागणी केली होती. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आय.पी.एस पंकज कुमावत यांच्याकडे हा तपास दिला होता. यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कलाकेंद्राच्या विरोधात आवाज उठवला होता.
दरम्यान आजूबाजूच्या अनेक गावातील तरुण या कलाकेंद्रामुळे वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जात होते. तर अनेकांचे जिवन बरबाद झाले होते. तसेच या कलाकेंद्रात विनापरवाना अवैध धंदे सुरू होते. यामुळे अनेकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत होता.
यानंतर अखेर महिलेसह लहान मुलीवर अन्याय करणाऱ्या, पत्रकार अशोक काळकुटे यांना धमकवणाऱ्या आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बीड तालुक्यातील धुळे-सोलापुर महामार्गावरील उदंड वडगाव येथील जगदंबा कलाकेंद्राला कुलुप लागले आहे. यामुळे परिसरातील महिलांसह नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
*लेखणीवर दबाव आणु पाहणाऱ्यांना दणका अशोक काळकुटे*.
मी या संदर्भातील तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर नेकनुर पोलिस ठाण्यात पोहचलो होतो प्रकरण गंभीर असुनही कारवाई ला विलंब होत असल्याने सूर्योदय च्या न्यूज पोर्टलवरून तात्काळ बातमी प्रकाशित करत परिसराचे काही फोटो घेतले होते. याचा राग मनात धरून चक्क आरोपींनी पोलीस स्टेशन च्या आवारातच धमकी दिली हा प्रकार म्हणजे दहशत माजवत लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाच्या लेखणीवर दबाव आणण्याचा प्रयत्न होता. या घटनेनंतर सर्व दैनिक, न्यूज पोर्टल, न्यूज चॅनलच्या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शविला. यामुळे दहशत माजवुन लोकांवर अन्याय करणाऱ्या आणि देखणीवर दबाव आणु पाहणाऱ्यांना हा एक दणका असुन सत्याचा विजय झाला आहे. याबद्दल मी सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो.
*दहशत माजवणाऱ्यांना चाप यापुढे अशा लोकांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे डॉ गणेश ढवळे*
महिलांवर दबाव टाकून वेश्या व्यवसाय करायला लावणं आणि १२ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवणं हि अतिशय धक्कादायक बाब होती. यामध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकार अशोक काळकुटे यांना देखील धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार अतिशय संतापजनक आणि धक्कादायक होता. या प्रकरणात प्रशासनाकडून कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज होती. परंतु प्रशासनाने यामध्ये हवी तशी कारवाई तात्काळ केली नाही ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे. परंतु या घटनेनंतर प्रशासनाचे या अवैध धंदे चालवणाऱ्या कलाकेंद्रावर लक्ष होते. यामुळे या अवैध व्यवसायाला अखेर कुलुप लागले हा सत्याचा विजय आहे.
आज जरी अशा एका दहशत माजवणाऱ्या टोळीला चाप बसला असला तरी अनेक ठिकाणी अशा लोकांकडून सामान्यांवर अन्याय केला जातो. तरी अशा दहशत माजवणाऱ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्या लोकांवर प्रशासनाची वेळोवेळी दृष्टी असणे गरजेचे आहे.