मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सविता वडीतके यांची बिनविरोध निवड

मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सविता वडीतके यांची बिनविरोध निवड
श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे गावच्या सरपंच पदी सौ सविता शहाजी वडीतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीचे सरपंच निखील वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे यांच्याकडे दिला होता .त्यांनी तो तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे सुपुर्त केला त्यांच्या सुचनेनुसार मांडवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीकरीता बैठक बोलविण्यात आली होती या वेळी सरपंच पदाकरीता सौ सविता शहाजी वडीतके यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी तथा मंडलाधिकारी बी के मंडलीक यांनी जाहीर केले.
या वेळी उक्कलगावचे कामगार तलाठी इलीयास ईनामदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे ग्रामसेवक ताराचंद गाढे तसेच रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य पुष्पाताई चितळकर कल्पना गेठे सुमन जांभुळकर गोविंद तांबे गोकुळ पवार अशोक विटनोर चेतन वडीतके जालींदर तांबे संपतराव चितळकर शहाजी वडीतके दगडू पावले बापुसाहेब काबुडके बाळासाहेब जांभुळकर अतुल तांबे पत्रकार देविदास देसाई भरत थोरात संदीप शेरमाळे मच्छिंद्र पारखे डाँक्टर उद्धव जोशी कृष्णा दळे बबनराव वाडीतके केशव दळवी भाऊसाहेब चितळकर संतोष चितळकर आशोक झाडगे आदिसह मांडवे तांबेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून बी के मडंलीक यांनी काम पाहीले त्यांना ग्रामविकास अधीकारी ताराचंद गाढे यांनी सहकार्य केले निवडीनंतर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली शेवटी शहाजी वडीतके यांनी सर्वांचे आभार मानले.