फसवणूक प्रकरणाच्या जुन्या गुन्ह्यातील बेलापूरातील एक जण पुणे पोलीसांच्या ताब्यात

फसवणूक प्रकरणाच्या जुन्या गुन्ह्यातील बेलापूरातील एक जण पुणे पोलीसांच्या ताब्यात.
बेलापुर (प्रतिनिधी )- करोडो रुपयांच्या मालमत्ता घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात बेलापूरातील एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा लुटे यांनी दिली असुन बेलापूरात हा चर्चेचा विषय बनला आहे . या बाबत पुण्यातील आर्थिक गुन्हा शाखेत मालमत्ता खरेदी विक्री प्रकरणात सन २०१६ मध्ये फसवणूक झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता करोडो रुपयांच्या मालमत्तेचा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते पोलीसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेवुन तपास केला असता बेलापुरातील राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या खात्यावर ९० लाख रुपयाचा धनादेश घेतला होता त्यानंतर ते पैसे आरोपीस परत दिले होते . ब्लँक मनी व्हाँईट करण्याचा हा प्रकार होता त्यामुळे पोलीसांनी सन २०१६ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरुन बेलापूरातील राजेंद्र ठोंबरे यास ताब्यात घेतले आहे . फसवणूकीच्या गुन्ह्यात मदत केल्याचा गुन्हा रंजिस्टर नंबर ७१/ २०१६ दाखल करण्यात आला होता.या आरोपीस अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हा शाखेचे पथक अनेक वेळा बेलापुर येथे आले होते परंतु आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीसांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा टुले यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने ठोंबरे यास ताब्यात घेवुन स्थानिक पोलीस डायरीला तशी नोंद करुन पुण्याला नेलेले आहे यातील मुख्य आरोपीस अटक होवुन त्याची जामीनवर मूक्तता देखील झालेली आहे परंतु या गुन्ह्यातील काही आरोपी अजुनही फरार असल्यामुळे या गुन्ह्याबाबतची अधिक माहीती देण्याचे तपासी अधिकारी मनिषा टूले यांनी टाळले