माऊलींच्या आळंदीत कोयता गँग ची दहशत*

*माऊलींच्या आळंदीत कोयता गँग ची दहशत*
संतांची भूमी असलेल्या आळंदीमध्ये मन विचलित करणारी घटना घडली आहे. दिवसाढवळ्या आठ जणांचे टोळक्याने कोयता उंचावत दहशत माजवण्याचा प्रयत्न नागरिकांमध्ये केला.आळंदी येथे दिनांक 21 सोमवारच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास काळे कॉलनी रस्त्यावर आठ जणांचे टोळक्याने कोयते उंचावत एकाला मारहाण केली. आणि जबरदस्ती त्याच्या कडून 2750 रुपये काढून घेतले. पळून जाताना परिसरातील नागरिकांना कोयते दाखवून दहशत निर्माण केली.याबाबत तेजस ज्ञानेश्वर गालफाडे वय 21 राहणार भामणेर धर्मशाळा हनुमान वाडी. तालुका खेड.यांनी दिले आहे. सदर प्रकरणात ऋषिकेश गडकर. अर्जुन वाघमोडे. ओमकार भोसले. ओमकार गाडेकर व इतर चार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गालफाडे सोबत आरोपीचे भांडण झाले होते.त्यातून हा गुन्हा घडलेला आहे. गालफाडे हे काळे कॉलनी मार्गे वरून जात असताना सदर आरोपीने त्याला अडवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.आणि जबरदस्तीने 2750 रुपये खिशातून काढून घेत.पळून जात असताना उपस्थित नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून.दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.दिघी पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या दहशतीमुळे आळंदीकर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस लवकरच कारवाई करतील आणि आरोपींना काय करते याबाबत आशा व्यक्ती केली जात आहे.