स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्याला दिशा देण्याचे काम टाकळीभान मध्ये होईल – भानुदास मुरकुटे

स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्याला दिशा देण्याचे काम टाकळीभान मध्ये होईल – भानुदास मुरकुटे
टाकळीभान येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामाचे भूमिपूजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
स्वच्छतेच्या बाबतीत टाकळीभान नेहमीच अग्रेसर राहिले आहे.संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले.या शिकवणीस अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात तालुक्याला दिशा देणारे काम टाकळीभान मध्ये होईल असा विश्वास मुरकुटे साहेब यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावपातळीवरील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ह्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते झाले.
तत्पूर्वी माजी आमदार आदरणीय भानुदास मुरकुटे साहेब यांनी टाकळीभान येथील महादेव मंदिर येथे नारळ वाढवून मनोभावे दर्शन घेतले आणि परिसराची पाहणी केली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सदर कामाची माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे म्हणाले की गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांसह कंपोस्ट खड्डे, मैला व्यवस्थापन, गावागावांतून कचराकुंड्याद्वारे व घराघरांतून गोळा होणा-या कचऱ्याचे विलगीकरण, प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, पुर्नवापर, पुर्नवर्गीकरण यासह सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत सांडपाणी शुध्दीकरण करण्याची प्रक्रिया व पुर्नवापर आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत. गाव पातळीवरील स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व ग्रामसेवक यांच्या मदतीने गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तयार करण्यात येणार आहे. यासाठी दिवसाला ४५, ३०, आणि १५ हजार लिटर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तसेच ५ नाडेप गावात विविध ठिकाणी बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब दिघे, ज्ञानदेव साळुंके, सरपंच अर्चना रणनवरे, अर्चना पवार शिवाजी शिंदे, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, यशवंत रणनवरे, किशोर बनसोडे, अण्णासाहेब दाभाडे, लहानभाऊ नाईक, एकनाथ लेलकर, भाऊसाहेब कोकणे, शंकर पवार, भाऊसाहेब मगर, रावसाहेब वाघुले, सुनील बोडखे, महेंद्र संत, तुकाराम बोडखे, प्रकाश दाभाडे, मोहन रणनवरे, गणेश गायकवाड, बाबासाहेब लोखंडे, शिवाजी पवार, भाऊसाहेब पटारे, दत्तात्रय पटारे, गोटिराम दाभाडे, संजय रणनवरे, संजय पटारे, शिवाजी पटारे, रोहिदास पटारे, दत्तात्रय बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते.