कृषीवार्ता

अशोकाच्या कार्यक्षेत्रात संगमनेर कारखाण्याने नोंदी घेतलेल्या सर्व ऊसाची तोड वेळेत करा –अॅड अजित काळे

अशोकाच्या कार्यक्षेत्रात संगमनेर कारखाण्याने नोंदी घेतलेल्या सर्व ऊसाची तोड वेळेत करा –अॅड अजित काळे

अशोकच्या कार्यक्षेत्रात संगमनेर कारखान्याने नोंदी घेतलेल्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे यांच्या शिष्टमंडळाने अॅड अजितराव काळे उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे नावे निवेदन देण्यात आले, दिनांक १/३/२०२२ रोजी श्रीरामपूर येथे उद्घाटनासाठी नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात येणार होते. परंतु ते येऊ न शकल्यामुळे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने श्रीरामपूरचे आमदार मा. लहुजी कानडे यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली.
मागील गेल्या दहा वर्षापासून संगमनेर कारखाना अशोकाच्या कार्यक्षेत्रातून मोठयाप्रमाणात नोंदी घेऊन ऊस घेऊन जात आहे. संगमनेर कारखान्याला कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नसलेले प्रसंगी अशोकमार्फतही मोठयाप्रमाणात अशोकच्या कार्यक्षेत्रातून ऊस नेला जातो. आज रोजी अशोकच्या कार्यक्षेत्रात अशोकच्या गळपक्षमतेपेक्षा जादा ऊस उपलब्ध असूनही अशोकानेही मोठ्या प्रमाणात बाहेरून ऊस आणला व आणत आहे. त्यामुळे अशोकाचाही तोडणी प्रोग्राम पूर्णतः कोलमडला आहे. संगमनेर कारखान्याने नोंदी घेतलेला ऊस अशोकसह कुठलाही कारखाना तयार नाही. संगमनेर कारखान्याने अशोकच्या व्यवस्थापणाचे ऐकून नोंदी घेतलेल्या ऊसाच्या तोडी बंद केल्या असून वैजापूर तालुक्यातून बिगर नोंदलेला ऊस आणत आहे. तोडी येणेचे अपेक्षेने शेतकऱ्यांनी ड्रीप गोळा केले. दोन- दोन महिन्यापासून ऊसाचे पाणी बंद केले. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी वीज बिल वसुलीसाठी १ -१ महिना ट्रान्स्फार्मर बंद करत आहे. या सर्व बाबीमुळे अशोकाच्या कार्यक्षेत्रातील ऊसाच्या खोडक्या झाल्या आहे. शेतकऱ्यांचे एकरी वीस टनाच्या आसपास आधीच नुकसान झाले आहे.एप्रिल ते मे महिन्यामध्ये ऊसाला तोडण्यासाठी धजणार नाही. अशा बिकट संकटात ऊस उत्पादक असताना वीज बिले भरायची कशी…?
असा प्रश्न व्यवस्थेमुळे निर्माण झाला आहे. या सर्व बाबीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी माननीय मंत्री महोदयांनी आपल्या कारखान्याने नोंदी घेतलेल्या ऊसाला तातडीने नियमाप्रमाणे तोडी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर स्वाभिमानीचे जितेंद्र भोसले, श्रीरामपूर ता. अध्यक्ष युवराज जगताप, नेवासे ता. अध्यक्ष हरिभाऊ तुवर, गोविंद वाघ, सुदामराव औताडे, संजय वमने, बाबासाहेब गलांडे, प्रकाश जाधव, प्रभाकर कांबळे, प्रभाकर तुवर, किशोर पाटील, दत्तात्रय लिप्टे , गोविंद वाबळे ,शरद पवार आदींच्या सह्या आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे